सध्या सोशल मीडियावर एका आशियायी तरुणाचा किस्सा खूपच गाजतो आहे. मुळचे आशिया खंडात असलेल्या रिचर्ड ली यांचे डोळे बारीक आहेत. आशिया खंडातील चीन, मलेशिया, जपान यासारख्या अनेक देशांत राहणा-या माणसांचे डोळे निसर्गत: बारिक असतात. ली याचे डोळेही तसेच बारिक आहेत. मात्र पासपोर्टसाठी फोटो काढताना पासपोर्ट रोबो त्यांचा फोटो वारंवार नाकारात होता. या व्यक्तीचे डोळे बंद असल्याने फोटो येऊ शकत नाही असा संदेश वारंवार त्यांच्या कॉम्प्युटर येत होता. त्यामुळे या एररची सगळीकडे चर्चा होत आहे.

न्यूझीलंडचे असलेले रिचर्ड ली यांनी पासपोर्टसाठी अर्ज केला होता. पण ऑनलाईन फोटो अपलोड करताना मात्र तो अपलोड होण्यास अडचणी येत होत्या. या व्यक्तीचे डोळे बंद आहेत असा संदेश त्यांना येत होता. पण ली यांच्या डोळ्यांची रचनाच तशीच आहे. त्यामुळे त्यांचे डोळे उघडे असले तरी ते बंद दाखवत होते. तेव्हा वैतागलेल्या ली यांनी पासपोर्ट विभागाला फोन करत आपली समस्या सोडवायला सांगितली. त्यामुळे हा किस्सा आता जगभर गाजतो आहे. पण पासपोर्ट विभागाने सावध भूमिका घेत त्यांच्या चेह-यावर प्रकाश कमी पडत असल्याने अशी समस्या येत असल्याचे सांगितले आहे.