News Flash

Viral Video : येथे कात्रीने नाही तर कु-हाडीने केस कापले जातात

अजब गजब केशकर्तनालय

एका युट्युब चॅनेलवर काही महिन्यांपूर्वी व्हिडिओ टाकण्यात आला असून यात हेअरस्टाईलिस्ट एका व्यक्तीचे केस चक्क कु-हाड घेऊन कापताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी मेणबत्ती वापरून केस कापणा-या शहाबाद गावामधल्या दशरथचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता सोशल मीडियावर कु-हाडीने केस कापणा-या एका हेअर स्टाईलिस्टचा व्हिडिओ धुमाकुळ घालत आहे. मोरोक्को येथील केशकर्तनालयातला हा व्हिडिओ असल्याचे समजते आहे. या व्हिडिओत हेअर स्टाईलिस्ट कात्री ऐवजी कु-हाड आणि हातोडी घेऊन केस कापताना दिसत आहे.

VIDEO : मोदींना धमकी देणारा पाकिस्तानी वृत्तनिवेदिकेचा व्हिडिओ व्हायरल

एका युट्युब चॅनेलवर काही महिन्यांपूर्वी व्हिडिओ टाकण्यात आला असून यात हेअरस्टाईलिस्ट एका व्यक्तीचे केस चक्क कु-हाड घेऊन कापताना दिसत आहे. कर्तनालयात आलेल्या एका तरुणाचा हेअर कट करताना धारधार कु-हाड वापरून त्यावर हातोड्याने ठोकून हा हेअरस्टाईलिस्ट केस कापताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधल्या शहाबाद गावातील दशरथ या हेअरस्टाईलिस्टचा व्हिडिओही खूप चर्चीला गेला. गुलबर्गमधल्या शहाबात गावात ‘दशरथ ऑफ राज मेन्स पार्लर’ आहे. येथे काम करणारे दशरथ कात्री ऐवजी मेणबत्ती घेऊन केस कापतात. गेल्या पाच वर्षांपासून ते पेटत्या मेणबत्तीने केस जाळतात आणि मग केस कापतात. ‘वेगळे काहीतरी दिले की ग्राहक नेहमीच आकर्षित होतात, मलाही ग्राहकांना नवीन काहीतरी द्यायचे होते. इथे नेहमी वीज जायची. वीज गेली की आम्ही मेणबत्त्या पेटवून काम करायचो. एकेदिवशी आपण मेणबत्ती वापरून का नाही केस कापायचे अशी कल्पना मनात आली. लगेच नेहमीच्या ग्राहकावर हा प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वी देखील झाला’ असेही दशरथने एका मुलाखतीत सांगितले होते. दशरथच्या अजब गजब केस कापण्याच्या पद्धतीमुळे रोज नवनवे ग्राहक त्याच्याकडे येतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 2:38 pm

Web Title: this barber use an axe hammer to give the perfect haircut
Next Stories
1 जगातील लठ्ठ महिलेला भारतात आणायचे कसे?
2 VIDEO : मोदींना धमकी देणारा पाकिस्तानी वृत्तनिवेदिकेचा व्हिडिओ व्हायरल
3 जयललिता यांच्याकडे होत्या १० हजारांहूनही अधिक साड्या?
Just Now!
X