काही दिवसांपूर्वी बर्मिघम विमानतळावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लँडिगच्या वेळी रन-वेवर वाहणा-या वा-यामुळे या विमानाला लँड होताना अडचण येत होती त्यामुळे काही काळ हे विमान रनवेवर अधांतरी तरंगत होते. असाच प्रकार बोईंग ७३७ विमानासोबतही झाला. हे प्रवासी विमान विमानतळावर लँड होत असतानाच वा-याच्या वेगामुळे एका दिशेला झुकले. त्यामुळे रनवेवर याचा काही भाग घासला पण दुस-याच क्षणी प्रसंगावधानता दाखवून या वैमानिकांनी विमान हवेत झेपावले.
विमान लँडिग करणे खरोखरच फार कठिण काम. यात वैमानिकाचा खरा कस पणाला लागतो. पण प्रसंगावधानता दाखवून वैमानिकाने विमान हवेत झेपावले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. प्राग विमानतळावरील हा व्हिडिओ आहे. वॅकलव हॅवल विमानतळावर बोईंग ७३७ हे विमान लँड होत होते. या विमानात मोठ्या संख्येने प्रवासी देखील होते. मात्र रनवेवर वाहत असणा-या सोसाट्याच्या वा-याने या विमानाचे संतुलन बिघडले. वैमानिकाने सुरक्षितरित्या हे विमान लँड करण्याचा प्रयत्न केला पण वा-याच्या वेगामुळे जमीनीवर हे विमान घासले गेले. पण दुस-याच क्षणी वैमानिकाने विमान हवेत झेपावले. यामुळे मोठी दुर्घटना टळली जर हे विमान वेळीच हवेत झेपावले नसते असते तर ही दुर्घटना प्रवाशांच्या जीवाशी बेतली असती. यावेळी विमानतळावर उपस्थित असलेल्या राडको या व्यक्तीने याचा व्हिडिओ काढला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.