21 September 2020

News Flash

उशिरा येण्याच्या कारणावरून बॉसने झापलंय? मग ही बातमी दाखवा..

मग ते वेळेवर कामाला येण्यापासून ते प्रत्येक गोष्टीत बॉसवर विशेष छाप पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांची दिवसभर धावपळ सुरूच असते. तरीही बॉसला खूश करणं सर्वांत कठीण काम, असं

उशिरा येण्याच्या कारणावरून बॉसने झापलंय? मग ही बातमी दाखवा..

कर्मचाऱ्यांनी ऑफीसमध्ये नियमांचं काटेकोर पालन करावं, असं प्रत्येक बॉसला वाटत असतं. मग ते वेळेवर कामाला येण्यापासून ते प्रत्येक गोष्टीत बॉसवर विशेष छाप पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांची दिवसभर धावपळ सुरूच असते. तरीही बॉसला खूश करणं सर्वांत कठीण काम, असं अनेकजण म्हणतात. सकाळी उठल्यापासून ऑफीसला वेळेवर पोहोचण्यासाठी अनेकांची तीच धडपड सुरू असते. कधी लेटमार्कची भीती तर कधी बॉस ओरडण्याची भीती. अशातच जर एखाद्याने न पटणारं कारण देत ऑफीसला उशिरा येत असल्याचा मेसेज बॉसला केला आणि त्यावर बॉसने अजिबात न रागावता उलट बेसबॉल गेम्सची तिकिटं दिली तर? होय, एका कर्मचाऱ्यासोबत अशीच घटना घडली असून त्याच्या बॉसने दिलेला रिप्लाय सध्या नेटकऱ्यांना प्रचंड भावतोय.

जेनला कामावर पोहोचण्यास उशिर होणार होता, म्हणून तिने बॉसला मेसेज पाठवला. ‘ऑफीसला पोहोचण्यास मला काही मिनिटे उशिर होईल,’ असा तो मेसेज होता. गेल्या सहा वर्षांत ती कधीच कामावर उशिरा गेली नव्हती, किंबहुना वेळेआधीच ती हजर असायची, म्हणून काळजीपोटी बॉसने तिला विचारलं की, ‘सर्व ठीक आहे का? कारण तू नेहमी वेळेवर हजर असतेस.’ यावर जेनने दिलेलं कारण वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल. ‘माझ्या पाळीव कुत्र्याचे फोटो काढण्यात मी दंग होते. म्हणून मी वेळेवर तयार होऊ शकले नाही,’ असं म्हणत तिने त्या कुत्र्याचाही फोटो शेअर केला. यावर केनमोलिर नावाच्या या बॉसने त्या फोटोंची प्रशंसा करत तिला बेसबॉल गेमची दोन तिकिटंही देणार असल्याचं म्हटलं. झालात ना तुम्हीही थक्क?

मोलिरने स्वत: या चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला असून नेटकऱ्यांकडून त्याच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 2:34 pm

Web Title: this boss reply to his employee who was late for work is winning hearts online
Next Stories
1 Viral Video : अरेच्चा! इतकी वर्षं आपण चुकीच्या पद्धतीने सुईत धागा ओवतोय?
2 इंडिगो विमानात डासांचं साम्राज्य! तक्रार करणा-या डॉक्टरला धक्के मारुन विमानातून उतरवलं
3 बजरंगबलींचा हा प्रवास लंकेवरल्या स्वारीइतकाच बिकट
Just Now!
X