News Flash

‘या’ देशात सैन्यच नाही

ज्या देशाकडे सैन्य अधिक तो सर्वात बलवान देश मानला जातो

आईसलँड हा असा देश आहे ज्या देशात सैन्य नाही.

देशाच्या संरक्षणात त्या देशाचे सैन्य खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. ज्या देशाकडे सैन्य अधिक तो सगळ्यात बलशाली देश मानला जातो. त्यामुळे सैन्य आणि शस्त्रसाठा महत्त्वाचा मानला जातो. भारत, चीन, अमेरिका, उत्तर कोरिया या देशाचे सैन्य अधिक आहे त्यामुळे हे देश बलवान देश मानले जातात. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी सशस्त्र सैनिकांची तुकडी आवश्यक आहे पण तुम्हाला माहिती आहे जगाच्या पाठीवर असाही एक देश आहे ज्याच्याकडे सैन्य नाही. जगातील सक्रिय सैन्य नसलेल्या देशात या देशाची गणना होते.

आईसलँड हा असा देश आहे ज्या देशात १८६९ पासून लष्कर नाही. ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ म्हणजे ‘नाटो’ ही लष्करी संघटना आहे. आईसलँड हा नाटोचा सदस्य आहे. एकूण अठ्ठावीस देश या संघटनेचे सदस्य आहेत. जर या संघटनेत असणा-या एखाद्या देशावर शत्रू राष्ट्राचा हल्ला झालाच तर संघटनेत असलेले इतर मित्र राष्ट्रांचे सैन्य त्याला मदत पुरवतात. त्यामुळे जर युद्ध झाले तर नाटोचे सदस्य असलेले देश आईसलँडला लष्करी मदत करतील. या देशात जरी सक्रिय सैनिकांची तुकडी नसली तरी सुरक्षेच्या दृष्टीने सा-या उपाय योजना करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे अजूनही शांतीसेना, हवाई सुरक्षा यंत्रणा, अत्याधुनिक सैन्याचा समावेश असलेले तटरक्षक दल, पोलीस यंत्रणा आणि व्यूहनितीचा अभ्यास असलेले पोलीस दल आहेत. पण याचा वापर गरज पडली तरच केला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 6:06 pm

Web Title: this county does not have a standing army
Next Stories
1 ‘ही’ आहेत भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरं !
2 येथे पुस्तकांच्या बदल्यात मिळते मोफत खाणे-पिणे
3 हा केक पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Just Now!
X