News Flash

Video : बापरे! या पाणीपुरीची किंमत ऐकून तोंडचं पाणी पळेल

एवढं काय आहे त्यात?

७५० रुपयांत मोजून फक्त चारच पाणीपुरी खाणाऱ्याच्या वाट्याला येतात

ज्यांना ‘पाणीपुरी’ आवडत नाही असे फार कमी लोक असतील. ‘पाणीपुरी’ असं नुसतं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं ना राव! आंबट, गोड पाण्यानं भरलेली ही पाणीपुरी फारफार तर वीस-पंचवीस रुपयांना मिळते. त्यामुळे जिभेचे चोचलेही पुरवले जातात, तात्पुरता पोटही भरतं अन् खिशालाही परवडतं. पण आता आम्ही तुम्हाला अशा पाणीपुरीबद्दल सांगणार आहोत जिची किंमत ऐकली तर तुमच्या तोंडचं पाणी पळेल. दिल्लीतल्या एका तरूणानं पाणीपुरीचा एका व्हिडिओ अपलोड केलाय. ज्यात या पाणीपुरीची किंमत ७५० रुपये असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

आता ही किंमत वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल. तुमच्या डोक्यात एव्हाना आकडेमोडही सुरू झाली असेल. ७५० रुपयांत मी किमान ३५ प्लेट तरी पाणीपुरी खाईन असं तुम्ही ही किंमत वाचून मनातल्या मनात म्हटलं असेल. पण जेव्हा आम्ही तुम्हाला पुढची गोष्टी सांगू तेव्हा तुम्हाला आणखी एक धक्का बसेल, तो म्हणजे असा की या ७५० रुपयांत ३५ प्लेट तर सोडाच पण साध्या ३५ पाणीपुरीही खाणाऱ्याच्या वाट्याला येत नाही. ७५० रुपयांत मोजून फक्त चारच पाणीपुरी खाणाऱ्याच्या वाट्याला येतात. आता वरची ओळ वाचून तुम्हाला आणखी धक्का बसेल ना! पण असो धक्कादायक असलं तरी हे खरं असल्याचं या व्हिडिओमधल्या तरुणानं तरी सांगितलं आहे.

‘hmm!’ या युट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. दिल्लीमधल्या ‘पुलम’ हॉटेलमधला हा व्हिडिओ आहे, जिथे एवढी महागडी पाणीपुरी मिळते. आता या पाणीपुरीमध्ये नेमकं एवढं काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 12:54 pm

Web Title: this delhi hotel serve 4 golgappe panipuri for 750 rs
Next Stories
1 रिलायन्स जिओच्या रिचार्जवरही आता कॅशबॅक!
2 Video : केजरीवालांना ट्रोल करण्यासाठी कपिल मिश्रानं आणलं ‘सोनू’ला!
3 Viral Video : हा पर्वत चढण्यासाठी फार हिंमत लागते बुवा!
Just Now!
X