23 November 2017

News Flash

Viral Video : बस चालकाचा प्रताप पाहून प्रवासीही चक्रावले

ड्रायव्हिंग करताना तो सफरचंद कापत होता

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 6:34 PM

या चालकाला नोकरीवरून तातडीने काढून टाकण्यात आलंय.

रेल्वेच्या महिला डब्यात भाज्या वगैरे निवडतानाचं दृश्य आपल्याला दिसणं काही नवं नाही. लोकलमध्ये ही दृश्य हमखास दिसतात. पण तुम्ही कधी एका चालकाला गाडी चालवाना सफरचंदाची साल काढताना पाहिलंय का? नाही मग या ‘महान’ चालकाचा व्हिडिओ पाहा. हा महान बस चालक चक्क बसमध्ये बसलेल्या शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात घालून गाडी चालवता चालवता सफरचंद सोलत होता. जेव्हा एका प्रवाशाने चालकाच्या केबिनमध्ये डोकावून पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला. एक हात स्टेअरिंगवर तर दुसऱ्या हातात साल काढण्याच्या यंत्राने तो सफरचंदाची साल काढण्यात मग्न होता. त्याचे हे स्टंट एका प्रवाशाने आपल्या मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केलेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चीनमधला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे प्रवाशाने काढलेल्या या व्हिडिओची दखल घेण्यात आली असून प्रवाशांचे जीव धोक्यात घालणाऱ्या या चालकाला नोकरीवरून तातडीने काढून टाकण्यात आलेय.

वाचा : एमिरेट्स एअर लाईनमधला ‘तो’ धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल

First Published on July 17, 2017 6:34 pm

Web Title: this driver peels apple while driving bus