आयआयटी आणि यूपीएससी पास कसं व्हायचं याबाबत प्रेरणादायी भाषणं देणारा आणि सोशल मीडियावरचा हिरो असलेल्या एका २० वर्षीय तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी)नं सोमवारी ही कारवाई केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तो तरूण बारावी नापास आहे. अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव अभय मीना असे आहे.

अभय मीना तरूणांतमध्ये लोकप्रिय असून सोशल मीडियावर त्याचे अनेक चाहते आहेत. तो पहिल्या प्रयत्नात आयआयटी आणि यूपीएससी परीक्षा कशी पास करायीच याबाबत प्रेणादायी भाषणं देतो. विशेष म्हणजे अभय मीनाला खऱ्याखुऱ्या पोलीस आधिकाऱ्यांकडून मेडल आणि सर्टीफिकेट मिळाली आहेत. कार्डवरील ब्रँच आणि कॅपिटलचं चुकीचं स्पेलींग पाहून अभयवर एका तरूणाला संशय आला.

जयपूरमधील जगतपुरातून राहत्या घरातून एसओजी अभयला बेड्या ठोकल्या. त्यावेळी अभयनं बेड्या ठोकणाऱ्याला धमकीही दिली. कमी वयात आयपीएस असल्याचे सांगत असल्यामुळे तरूणांमध्ये अभयची प्रचंड लोकप्रियता असल्याचे एएसपी करन शर्मा यांनी सांगितले.

जगतपुरा शहरातून अभय थ्री स्टार प्लेट लावलेल्या कारमधून प्रवास करतो. थ्री स्टार प्लेटमधील गाडीतून डीजी किंवा एडीजी रँकचे अधिकारी प्रवास करतात. थ्री स्टार प्लेटचं पद हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी राखीव असते. आश्चर्यची बाब म्हणजे अभयची गाडी ट्रॅफीक पोलिसांनीही कधी तपासली नाही. आरोपी अभय आपल्या जोडीदारासोबत महागड्या हॉटेलमध्ये राहत असे. अभय स्वत: दिल्ली कॅडर आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत असे.