21 September 2020

News Flash

हौसेपोटी काढलेल्या फोटोमुळे घडली तुरुंगवारी!

पोलिसांच्या स्मार्ट कामगिरीमुळे दुचाकीस्वाराला घडली तुरुंगवारी

छाया सौजन्य- सोशल मीडिया

बाईक स्टंट करणारे अनेक तरुण आपली छायाचित्रं समाज माध्यमांवर अपलोड करतात. आपण किती कूल आहोत, हे दाखवून लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्याचा मुलांचा प्रयत्न असतो. मात्र बंगळुरुत राहणाऱ्या मोहम्मद जुबेरने केलेला असाच एक उद्योग त्याला थेट तुरुंगात घेऊन गेला. कोल्स पार्कमध्ये राहणाऱ्या मोहम्मदची समाज माध्यमांवरील छायाचित्रे बंगळुरु पोलिसांनी पाहिली आणि त्याला तुरुंगवास घडला. फ्रेझर टाऊनमध्ये दुचाकीवर विली करत असतानाची छायाचित्रे जुबेरने सोशल मीडियावर  प्रसिद्ध केली होती.

“२१ वर्षीय जुबेरला ऑनलाईन पाहून मग त्याचा माग काढण्यात आला आणि मग त्याला अटक करण्यात आली”, अशी माहिती बंगळुरु पोलिसांनी दिली आहे.

धोकादायकपणे वाहने चालवणाऱ्या चालकांना आळा घालण्यासाठी शहर पोलिसांकडून समाज माध्यमांचा वापर केला जातो आहे. “जुबेरला बकरी ईदच्या दिवशी ताब्यात घेण्यात आले आणि आता त्याची सुटका करण्यात आली आहे. आम्ही त्याची सुझुकी ऍक्सेस ताब्यात घेतली आहे. पोलीस उपायुक्तांनी या प्रकरणात लक्ष घातले होते आणि त्यांच्याकडून अशा घटनांमध्ये कडक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना अशा घटनांची माहिती असल्यास त्यांनी १०० क्रमांकावर किंवा ट्विटरवर संपर्क साधावा”, असे फ्रेझर शहराच्या वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक गोपाल नायक यांनी सांगितले आहे.

दुचाकीवर स्टंट करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्यासाठी पोलीस नव्या पद्धतीचा वापर करणार आहेत. “अशा प्रकारचे स्टंट करणारे तरुण वारंवार त्यांची वाहने बदलतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे अवघड होते. त्यामुळे अशा तरुणांवर कारवाई करण्यासाठी नव्या पद्धतीचा वापर करण्यात येईल”, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी अभिषेक गोयल यांनी दिली आहे.

अनेक तरुणांना दुचाकी चालवताना स्टंट करण्याचा छंद असतो. आपण केलेले स्टंट आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी मग स्टंटची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली जातात. मात्र आता असे स्टंट स्टंटबाजांना थेट तुरुंगात नेऊ शकतात. कारण पोलिसांनीदेखील स्मार्ट होत समाज माध्यमांचा वापर सुरू केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 3:43 pm

Web Title: this guy posted pictures on facebook showing off his bike stunts and you wont believe what happened next
Next Stories
1 ‘या’ चष्म्यात होते व्हिडिओ रेकॉर्डिंग
2 थाटामाटात पार पडला सिंहाचा लग्नसोहळा
3 मिशेल यांनी माजी राष्ट्राध्यक्षांना दिली ‘जादू की झप्पी’, सोशल साइटवर फोटो झाला व्हायरल
Just Now!
X