चॉकलेट, व्हॅनिला, स्टॉबेरी, बटरस्कॉच एक ना दोन आइस्क्रीमचे हजारो प्रकार आहे आहेत पण तुम्हाला या आइस्क्रीमच्या प्रकारांव्यतिरिक्त सोन्यापासून बनवलेले आइस्क्रीम देखील जगाच्या पाठीवर मिळते असे सांगितले तर विश्वास बसेल का ? तुमचा विश्वास बसो अगर ना बसो पण न्यूयॉर्कमधल्या एका कॅफेमध्ये ५ ग्रॅम सोने टाकून आइस्क्रीम बनवले जाते. या आइस्क्रीमच्या एका स्कूपसाठी जवळपास ५४ हजार रुपये एवढी मोठी रक्कम मोजावी लागते. जगातील सगळ्यात महागड्या आइस्क्रीममध्ये या आइस्क्रीमचा सहभाग आहे. फ्रोझन हाँटे चॉकलेट असे या आइस्क्रीमचे नाव. या आइस्क्रीमच्या नावाची नोंद गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे. जगभरातील २८ प्रकारचे चॉकलेट वापरून हे आइस्क्रीम तयार केले जाते. तसेच यात २३ कॅरेट सोनेही वापरले जाते. न्यूयॉर्कमधल्या ‘सेरेनड्रिपीटी ३’ या कॅफेमध्ये हे आइस्क्रीम तयार होते. या आइस्क्रीमच्या प्रत्येक स्कूपमध्ये पाच ग्रॅम खाण्यायोग्य सोने असते. या कॅफेमध्ये अशी अनेक महागडी आइस्क्रीम मिळतात. १९५४ मध्ये हे कॅफे सुरु करण्यात आले. अनेक हॉलीवूड चित्रपटांमध्ये हा कॅफे दाखवण्यात आला आहे.