News Flash

असे दिसते जगातील पहिले ATM मशीन

तिला सोन्याचा मुलामाही देण्यात आलाय

२७ जून १९६७ मध्ये हे एटीएम सुरू करण्यात आलं.

एटीएम ATM पैसे काढण्यासाठी याचा वापर आपण करतो. ठिकठिकाणी एटीएमची सोय असल्याने समजा पैशांची अडचण आलीच तर बँकेत न जाता आपण एटीएमच्या मदतीने पैसे काढू शकतो. किती सवय झालीय ना आपल्याला या एटीएमची. पण तुम्हाला माहितीय सगळ्यात पहिलं एटीएम कुठे सुरू करण्यात आलं? लंडनमधल्या एन्फिल्ड इथल्या बार्क्लेज बँकच्या शाखेत पहिलं एटीएम मशीन बसवण्यात आलं होतं. २७ जून १९६७ मध्ये इथे हे एटीएम सुरू करण्यात आलं. नुकतीच या मशीनला ५० वर्षे पूर्ण झाली. ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या बँकेने मशीनला सोन्याचा मुलामा चढवला आहे.

Viral : ‘जादू की झप्पी’ देऊन पोलिसानं केलं चोराचं मनपरिवर्तन

जॉन शेफर्ड बॅरन यांना पहिल्यांदा एटीएम मशीनची संकल्पना सुचली असं अनेकांचं म्हणणं आहे. १९२५ साली शिलाँगमध्ये बॅरन यांचा जन्म झाला. असं म्हणतात गरज ही शोधाची जननी आहे आणि याच गरजेतून बॅरन यांना एटीएमची कल्पना सुचली. बॅरन यांना पैशांची तातडीने आवश्यकता होती, पण त्यादिवशी नेमक्या बँका बंद होत्या. तेव्हा पैसे काढण्याची दुसरी एखादी सोय असती तर लोकांना त्याचा किती फायदा झाला असता अशी सहज कल्पना त्यांना आली आणि त्यातूनच तयार झालं एटीएम हे मशीन. यापूर्वी जपानमध्ये अशी मशीन होती, पण या मशीनचा वापर कर्ज देण्यासाठी केला जायचा, तेव्हा बॅरनच्या कल्पनेतून तयार झालेली मशिन जगातील पहिली एटीएम मशीन ठरली आहे. लंडनमध्ये बसवण्यात आलेल्या एटीएम मशीन्सचं रुपडं आता पूर्णपणे बदललं आहे, सोन्याचा मुलामा देण्यात आलेली मशीन एका नव्या क्रांतीचं प्रतिक म्हणून अभिमानाने तिथे उभी आहे.

वाचा : केंद्रीय मंत्र्यांची सार्वजनिक ठिकाणी लघुशंका; स्वच्छता अभियानावरच पाणी फेरले!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 4:45 pm

Web Title: this is the worlds first atm in london
Next Stories
1 Viral : ‘जादू की झप्पी’ देऊन पोलिसानं केलं चोराचं मनपरिवर्तन
2 Viral : अहो, GST स्टेशन कधी येईल?
3 Video : मगर घरात शिरली, अन्…
Just Now!
X