22 January 2021

News Flash

किचनमध्ये कुत्रा निपचित पडला होता, मालकाला आली भलतीच शंका; सत्य समोर आलं अन्…

पाळीव कुत्र्याची करामत.. हल्ल्याच्या भीतीने मालक होता चिंतेत पण घडलं भलतंच..

पाळीव प्राणी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे आज अनेकांच्या घरात आपण कुत्रा, मांजर किंवा अन्य पाळीव प्राणी पाहतो. विशेष म्हणजे काही जण आपल्या पोटच्या पोरांप्रमाणे या प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात. त्यांना जरा जरी कुठे लागलं किंवा खरचटलं तर त्यांच्या मालकाच्या हृदयाला पिळ पडतो. त्यामुळे या पाळीव प्राण्यांची ते फार काळजी घेत असतात. मात्र, हे पाळीव प्राणीदेखील एखाद्या खोडकर मुलांपेक्षा कमी नसतात. त्यांच्या मस्तीखोर स्वभावामुळे ते अनेकांचं मनं जिंकून घेतात. तर काही वेळा मात्र, त्यांची मस्ती मालकासाठी जीवघेणी ठरते. असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीच्या बाबतीत घडला आहे. या व्यक्तीचा आणि त्याच्या पाळीव प्राण्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये एका पाळीव श्वानाने त्याच्या करामतीमुळे मालकाला पार पळताभुई करुन सोडलं होतं. घरात कोणी नसताना हा श्वान मस्तपैकी घरात मस्ती करत होता. मात्र, त्याच्या मस्तीमुळे या श्वानाच्या जीवाचं काही तरी बरं वाईट झालं आहे. त्याच्यावर हल्ला झाला आहे, असा समज त्याच्या मालकाचा झाला. पण, क्षणभरातच आपल्या श्वानावर कोणताही हल्ला झाला नसून त्याच्या करामतींमुळे गैरसमज निर्माण झाल्याचं या मालकाच्या लक्षात आलं.


घरात कोणीही नसताना हा श्वान घरात धुडगूस घालत होता. खेळता खेळता को किचनमध्ये गेला आणि त्याने जॅमची सगळी बाटली अंगावर सांडली आणि तशाच अवस्थेत तो किचनमध्ये झोपला. विशेष म्हणजे श्वानाचा मालक घरात आल्यानंतर त्याने आपल्या पाळीव श्वानाला जमिनीवर निपचित पडल्याचं पाहिलं. त्यातच अंगावर जॅम सांडल्यामुळे ते रक्तच आहे की काय असा समज त्याला झाला आणि तो तात्काळ घाबरला. कोणी तरी घरात घुसून हा हल्ला केलाय असं त्याला वाटलं. मात्र, थोडा वेळ गेल्यानंतर हा श्वान उठला आणि मालकाला सगळा प्रकार लक्षात आला.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या खट्याळ श्वानाचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एका बाजूला तो जमिनीवर निपचित पडल्याचं दिसून येत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याने हळूच त्याची जीभ बाहेर काढून पोझ दिली आहे. त्याचा हा फोटो पाहून हा श्वान खरंच फार करामतीखोर असल्याचं नेटकऱ्यांमध्ये म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2021 11:53 am

Web Title: this isnt the crime scene this doggo will have you believe find out what s happening ssj 93
Next Stories
1 प्रेयसीने विवाहित प्रियकराला मिळवण्यासाठी मोजले तब्बल दीड कोटी रुपये, का लावली प्रेमाची किंमत?
2 सर्वात वेगवान पक्ष्यासोबत दुबईच्या राजपुत्राने लावली ‘रेस’, कोण जिंकलं? बघा व्हिडिओ
3 आयर्लंडच्या फेसबुक अधिकाऱ्यांनी वाचवला महाराष्ट्रातील तरुणाचा जीव, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Just Now!
X