News Flash

कोविड करी आणि मास्क नान, जोधपूरमधील रेस्टॉरंटचा मेन्यू सोशल मीडियावर व्हायरल

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल मालकांचे प्रयत्न

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. आजही देशात विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या भागांमध्ये लॉकडाउन सुरुच आहे. मात्र इतर भागांत सरकारने अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी काही दुकानं सुरु करण्याची परवानगी दिली आहे. काही भागांमध्ये हॉटेल व्यवसायिकांनाही सर्व नियमांचं पालन करुन होम डिलीव्हरी सर्विस सुरु करण्याची परवानगी दिली आहे. जोधपूरमधील एका रेस्टॉरंटने आपल्या हॉटेलमध्ये ‘कोविड करी’ आणि ‘मास्क नान’ असा एक खास पदार्थ आणला आहे.

जोधपूरमधील Vedic multi-cuisine या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ सुरु करण्यात आला आहे. कोविड करी हा मलई कोफ्त्याचा एक प्रकार असून यात कोफ्त्यांना कोविड विषाणूच्या आकारात बनवण्यात येत आहे. तर हॉटेलमध्ये मिळणारे नानही मास्कच्या आकाराचे बनवण्यात येत आहेत. करोनामुळे सध्या लोकं बाहेर पडण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे जोधपूरमधील या रेस्टॉरंटने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा पद्धतीचे नवीन पदार्थ बनवण्यास सुरुवात केली आहे.

“ग्राहकांच्या तब्येतीची आणि सुरक्षेची काळजी घेणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. स्वच्छता आणि होम डिलेव्हरी दरम्यान आम्ही सर्व नियमांचं पालन करत आहोत. सर्व नियमांचं पालन करुन नवनवीन पदार्थ ग्राहकांसाठी आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं रेस्टॉरंटने मालकाने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 12:11 pm

Web Title: this jodhpur restaurants covid curry and mask naan go viral psd 91
Next Stories
1 Viral जाहिरात : बाजारात आला ‘राफेल पान मसाला’
2 पर्रिकर आज तुम्ही हवे होतात… राफेल टच डाउन करताच देशवासियांना झाली त्यांची आठवण
3 एका जमान्यात ३५ रुपयांच्या मजुरीसाठी राबणाऱ्या मुनाफ पटेलने गावात उघडलंय कोविड सेंटर
Just Now!
X