26 September 2020

News Flash

ग्राहकांवर भरोसा ठेवणारं दुकानदारच नसलेलं दुकान

खरेदीसाठी येणारे लोक प्रमाणिकपणे पैसे देऊन सामान खरेदी करतात.

सामान खरेदी करण्यासाठी तुम्ही दुकानात गेल्यानंतर तिथे विक्रेताच(दुकानदार) नसेल तर… फक्त विचार केला तर अनेक प्रश्न आपल्या डोक्यात येतात. पण केरळातील कन्नूरजवळील एका गावात ग्राहकांच्या विश्वासावर चालणारे एक दुकान आहे. त्या दुकानामध्ये विक्रेताच नाही.

कन्नूरजवळील अझीकोड गावांमध्ये दिव्यांगांनी हे दुकान सुरू केलं आहे. एक जानेवारी २०१९ रोजी दिव्यांग जनशक्ती ट्रस्टच्या मदतीने या दुकानाचा शुभारंभ झाला. सामानाच्या विक्रीसाठी दुकानामध्ये कोणीही नाही. लोक येतात सामान घेतात, त्यानंतर त्याची किंमत पेटीमध्ये टाकतात. दुकानामधील सर्व सामान दिव्यांनी तयार केले आहे. या दुकानातील सामान तयार करणारे सर्वजण दिव्यांग जनशक्ती ट्रस्टशी जोडले गेलेले आहेत. या दुकानाची देखरेख जवळील दुकानदार करतात. आसपासचे लोक सकाळी सहा वाजता दुकान उघडतात आणि संध्याकाळी १० वाजता बंद करतात.

दररोज वापरात येणारे सामान या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. या दुकानातून मिळाणारी रक्कम ट्रस्टला दिली जाते. दुकानासमोर एक बोर्ड लावण्यात आला आहे. ” या दुकानात कोणीही नाही, तुम्हाला हवं ते सामान खरेदी करा. सामानावर लिहण्यात आलेली किंमत येथे ठेवण्यात आलेल्या बॉक्समध्ये टाकावी”

खरेदीसाठी येणारे लोक प्रमाणिकपणे पैसे देऊन सामान खरेदी करतात. सोशल मीडियावर सध्या या दुकानाची चर्चा सुरू आहे. नेटीझन्सकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2019 11:41 am

Web Title: this kerala shop has no shopkeeper and the reason will touch your heart
Next Stories
1 भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर आनंद महिंद्रांनी केलेले ‘हे’ ट्विट झाले व्हायरल
2 …तर मुंबईला यासाठी मिळाला असता ऑस्कर, मुंबई पोलीसांचे ट्विट
3 ‘निवांत झोपा पाकिस्तानी हवाई दल जागे आहे’, ट्विटनंतर साडेतीन तासात भारतीय हवाई दलाने केला हल्ला
Just Now!
X