News Flash

रूग्णांना वाचवताना गाडी जळली अन्….

या भीषण आगीमध्ये आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलांमध्ये मागील काही दिवसांपासून सतत आग लागत आहे. या भीषण आगीमध्ये आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाशेपेक्षा जास्त लोक बेपत्ता आहे. या भीषण आगीमध्येही लोकांना वाचवण्यासाठी एका पुरूष नर्सने आपली कार वापरली. पण या भीषण आगीमध्ये त्याची कार जळली. त्याने आपल्या गाडीची पर्वा न करता अनेकांचे जीव वाचवले. गाडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गाडी तयार करणाऱ्या कंपनीने त्याचे हे शोर्य पाहून त्याला नवी कोरी गाडी भेट म्हणून दिली आहे.

स्थानिक पत्रकार जॅक निकसने त्या मेल नर्सच्या गाडीचा फोटो ट्विट केला आहे. ‘ पॅराडाईज शहारातील जंगलामध्ये लागलेल्या आगीतील एक अनोखी आणि दिलचस्प स्टोरी समोर आली आहे. संपूर्ण शहर आगीमध्ये जळत होते. त्यावेळी Allyn pierce आपल्या गाडीतून नागरिकांना वाचवण्याचे काम करत होता.’

 

कॅलिफोर्नियामध्ये आगीपासून लोकांना वाचविण्यासाठी 10 हजार कर्मचारी काम करत आहेत. मात्र, वेगवान वाऱ्यांमुळे आग वेगाने इतर भागात पसरत आहे. कॅलिफोर्नियातील पॅराडाईज हे शहर पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. हे शहर पुन्हा वसविण्यासाठी काही वर्षे लागणार असल्याचे तेथील अधिकारी सांगतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2018 5:06 pm

Web Title: this man drove his burning truck through the california wildfires to save peoples
Next Stories
1 टबभर चिल्लर देऊन आयफोन विकत घेण्यामागचं कारण विचार करण्यासारखं…
2 चर्चा तर होणारच! दीप-वीरच्या लग्नाचे भन्नाट मीम्स व्हायरल
3 बलात्काराच्या आरोपीची सुटका केल्याने आयर्लंडमध्ये आक्रोश, अंतर्वस्त्र घेऊन संसदेत पोहोचली महिला खासदार
Just Now!
X