विमानाचा प्रवास म्हटल्यावर सर्वात पहिल्यांदा डोक्यात विचार येतो किती वजनापर्यंत सामान घेऊन जाता येईल याचा. अनेकदा प्रवाशांना मर्यादेपेक्षा अधिक वजन असल्यास सामान विमानतळावर काढून ठेवावे लागते. फ्रान्समधील नाईस विमानतळावरही एका प्रवाशाला अशाप्रकारे मर्यादेपेक्षा अधिकचे सामान काढून ठेवण्यास सांगण्यात आले. मात्र आपल्या बॅगचे वजन कमी करण्यासाठी या व्यक्तीने चक्क १५ शर्ट अंगावर चढवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्यक्तीने लढवलेली शक्कल भन्नाट असल्याचे मत सोशल नेटवर्किंगवर नोंदवले आहे.

स्कॉटलंडमधील गॅस्कगो येथे राहणारे जॉन आर्यव्हीन आणि त्यांचे कुटुंबिय फ्रान्सवरुन मायदेशी परत येत होते. जेव्हा जॉन विमानतळावर पोहचले तेव्हा ते प्रवास करत असणाऱ्या इजीजेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना त्यांच्याकडील बॅगांचे वजन अधिक असल्याचे सांगितले. बॅगा घेऊन जायच्या असतील तर वजन कमी करावे अथवा अतिरिक्त पैसे देऊन बॅगा घेऊन जाव्यात असा पर्याय जॉनसमोर विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठेवला. मात्र जॉन यांनी यापैकी एकही पर्याय न निवडता बॅगमधील कपडे अंगावर घालण्यास सुरुवात केली. या संपूर्ण प्रकाराचे शुटींग जॉन यांचा मुलगा जोश याने केले आणि ते ट्विटर तसेच स्नॅपचॅटवरुन पोस्ट केले. जोश आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ‘विमातळावर आमच्या बॅगांचे वजन जास्त झाले होते. त्यामुळे माझ्या वडिलांनी बॅगचे वजन कमी करण्यासाठी बॅगेतील १५ शर्ट अंगावर घातले. अर्थात इतकी शर्ट घातल्यावर त्यांना घाम फुटला होता.’

अनेकांनी या कल्पनेला ट्विटवरुन सलाम केला आहे.

१) छान

२) फ्रेण्डसमधला हा किस्सा आठवला

३) घामाच्या धारा

४) स्कॅम

५) नक्कीच भारतीय असणार

हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. साडेचार हजारहून अधिक लोकांनी त्याला रिट्वीट केले असून ३५ हजारहून अधिक जणांनी तो लाइक केला आहे. पाच दिवसांमध्ये या व्हिडिओला ट्विटवर आठ लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.