News Flash

viral : तिच्या तीन पायांचे रहस्य काय?

चक्रावून टाकणा-या फोटोतले रहस्य शोधण्याची स्पर्धा

( छाया सौजन्य : AMassiveTRexHoldingaBaby/ Imgur)

सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही फोटो कधी कधी खूपच चक्रावून सोडतात. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या सहा मैत्रिणांचा फोटो तुम्हाला आठवतोय का? मैत्रिणी सहा दिसत असल्या तरी पाय मात्र पाच जणींचे दिसत होते त्यामुळे फोटोत नक्की पाच तरुणी की सहा तरूणी याचे उत्तर शोधण्याची जणू स्पर्धाच सुरू होती. आता असाच चक्रावून टाकणारा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या फोटोत एका तरुणीला चक्क तीन पाय दिसत आहेत.

वाचा : या व्हायरल फोटोचे कोडे सुटता सुटेना

इमगूरवर एका तरूणीने फोटो शेअर केला आहे. तरुणी जमिनीवर गुघडे टेकून बसलेली दिसत आहे. पण चक्रावून टाकणारा प्रकार असा आहे की पाहताचक्षणी तिला तीन पाय दिसत आहेत. तीन पायांचा मनुष्य प्राणी तरी अस्तित्वात नाही. कदाचित हे फोटो फॉटोशॉप केले असतील. पण तसेही नाही. मग तिला तिसरा पाय आला कुठून असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. या विचित्र फोटोमागच्या कोड्याने अनेकांना बुचकाळ्यात पाडले खरे. हा फोटो लाखो लोकांनी पाहिला तर कित्येकांनी तो शेअर केला. मात्र काहींनाच अगदी काही सेंकदात याचे उत्तर शोधता आले.

झाले असे की या तरूणीने हातात मातीची फुलदाणी घेऊन फोटो काढला. ही फुलदाणी तिने डाव्या बाजूला धरली होती. या फुलदाणीची रंग आणि तिच्या पायातील स्टॉकिंगचा रंग एकमेकांत असे काही मिसळले की ऑप्टीकल इल्यूशनमुळे तिला तीन पाय असल्याचे दिसत आहे.

Viral : प्रियकराच्या ‘बेवफाई’चे प्रेयसीने लावले गावभर पोस्टर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 8:10 pm

Web Title: this pic of a woman sitting on the floor goes viral on socail media
Next Stories
1 Viral : ग्रंथालयात प्रवेश मिळवण्यासाठी चिनी विद्यार्थ्यांनी लावली पहाटेपासून रांग
2 एक होते ‘पायोनिअर ट्री’
3 Yahoo चे नाव बदलणार
Just Now!
X