News Flash

Video : जळगावच्या या ‘सिक्रेट सुपरस्टार’साठी एक लाईक तर बनतोच ना!

गाणं एकदा ऐकलंच पाहिजे

संघपाल याने संगीताचे औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. (व्हिडिओ : अभिजीत मुळ्ये/ फेसबुक साभार)

गेल्या काही काळात सोशल मीडियाने सामान्य व्यक्तींना त्यांची कला दाखवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे ज्यांच्या अंगी कला आहे त्यांना याच माध्यमामुळे प्रसिद्ध होण्याची आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. जळगाव पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या संघपाल तायडे या पोलिसाला त्याचा चांगला अनुभव आला असेल. आपल्या सुरेल आवाजामुळे तो आता सोशल मीडियावरचा ‘सिक्रेट सुपरस्टार’ झाला आहे.

संघपाल याने संगीताचे औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. पण, त्याचे गाणे ऐकल्यानंतर मंत्रमुग्ध व्हायला होते. काही दिवसांपूर्वी संघपाल तायडे शिर्डी येथे बंदोबस्तावर होता. यावेळी निव्वळ मनोरंजन म्हणून इतर सहकाऱ्यांनी त्याला गाण्याचा आग्रह केला. सहकाऱ्यांच्या विनंतीला मान देत त्यानं गाणं गायलं. हे गाणं त्याचा मित्र अभिजित मुळ्ये यांनी सोशल मीडियावर शेअर केलं. हा व्हिडिओ इतका गाजला की आपल्या सुरेल आवाजानं तायडे रातोरात सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला.

तो २००८ पासून जळगाव पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कर्तव्य बजावत आहे. पण, आपलं कर्तव्य बजावताना त्यांनी गाण्याची आवडही जपली आहे. त्यामुळे जळगाव पोलीस खात्यातील या ‘सिक्रेट सुपरस्टार’साठी एक लाईक तर बनतोच ना!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 5:58 pm

Web Title: this police from jalgaon singing talent will blow your mind
Next Stories
1 जगातील सर्वात मोठ्या डायनिंग हॉलमध्ये इव्हांकासाठी ‘हैदराबादी दावत’
2 बायकोसाठी अॅमेझॉनवरून मागवला आयफोन -७, पण निघाला…..
3 Viral Video : पोलिसांनी नाट्यमयरित्या तिला ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं
Just Now!
X