स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाण अधिक असलेल्या राज्यांच्या यादीत राजस्थानचाही समावेश आहे. पण याच राजस्थानमध्ये असं एक गाव आहे जिथे प्रत्येक मुलीच्या जन्माचा आनंद वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. या गावात मुली जन्माला आल्यानंतर वृक्षारोपण केलं जातं. ज्या कुटुंबात मुलीचा जन्म होतो ते कुटुंब १११ झाडांचे रोपण करतात. मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करणं, जंगलतोड रोखणं असे उपक्रम या गावात राबवले जातात या गावाचं नाव आहे पिपलांत्री.

एएनआय या वृत्तसंस्थेनं या गावचा छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे मुली जन्मला आली की वृक्षारोपण करून आनंद साजरा केला जातो. या गावातील भागाला गावकऱ्यांनी ‘कन्यावन’ असं नाव दिलं आहे. वृक्षारोपणामुळे गाव हिरवंगार झालं आहे. गावकऱ्यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाची अनेकांनी दखल घेतली आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा, स्त्रीजन्मला उत्सव साजरा करण्याची गावकऱ्यांचा हा पर्याय सगळ्यांनाच खूप आवडला आहे.