12 December 2017

News Flash

या शाळेत शिक्षकच घेतात विद्यार्थ्यांचा आशीर्वाद…

असे दृश्य तुम्ही याआधी नक्कीच पाहिले नसेल

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 1:45 PM

छायासौजन्य - नईदुनिया

हिंदू धर्मात ज्येष्ठांना नमस्कार करुन त्यांना सन्मान देण्याची पद्धत आहे. याबदल्यात ज्येष्ठांकडून आशीर्वादही मिळतात. याशिवाय शिक्षकांनाही गुरु मानत असल्याने त्यांच्याही पाया पडले जाते. मात्र मुंबईतील एका शाळेत याच्या उलट घडताना दिसते. याठिकाणी शिक्षकच विद्यार्थ्यांना नमस्कार करत असल्याचे दिसते. ऋषिकुल गुरुकुल विद्यालयाच हे चित्र रोज सकाळी पहायला मिळते.

आता ही पद्धत कशामुळे पडली असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल. तर भारतात लहान मुलांना देवासमान मानले जात असल्याने त्यांना नमस्कार करणे म्हणजे देवाला नमस्कार केल्यासारखेच आहे. या पद्धतीमुळे मुलांच्या मनातही शिक्षकांबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. या शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांकडून आशीर्वाद मागतात. नकळत याचा परिणाम या लहानग्यांच्या मनावर होतो आणि आपणही आपल्यापेक्षा वय़ाने मोठ्या असणाऱ्यांबरोबरच लहानांचाही सन्मान केला पाहिजे ही भावना रुजते.

मुंबईतील घाटकोपरमध्ये असणारी ही शाळा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांनीच शिक्षकांना आदर देऊन त्यांना नमस्कार केला पाहीजे या पारंपरिक संकल्पनेला छेद देत या शाळेने एक वेगळा उपक्रम राबविला असल्याचे या निर्णयावरुन दिसून येत आहे.

First Published on June 19, 2017 1:45 pm

Web Title: this school is really different where teachers touches the feet of students