एका छोट्या रंगीत माशावर चक्क एक दोन हजारांची नाही तर १ लाख २ हजारांची बोली लावली गेली आहे. या माशांच्या बोलीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याला कारणही तसेच आहे. या माशाचा रंग थायलँडच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाशी अगदी मिळता जुळता आहे. त्यामुळे हा मासा खरेदी करण्यासाठी अनेकांनी बोली लावली आहे. काचेन वॉराचाय नावाच्या व्यक्तीने या माशाचा फोटो एका लिलाव करणा-या फेसबुक पेजवर टाकला आणि अल्पावधितच या माशाला हजारोंची बोली लावायला सुरूवात झाली. या माशाच्या शरीरावर थायलँडच्या राष्ट्रध्वजाचा रंग आहे. त्यामुळे या दुर्मिळ माशाची खरेदी करण्यासाठी मत्सप्रेमींनी लाखोंची बोली लावली आहे. बेट्टा या प्रजातीचा हा मासा आहे. दोन दिवसांतच त्याच्यावर लावण्यात आलेल्या बोलीच्या किंमतीत वाढ झाली आहे. काचेन यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात या माशावर बोली लागेल याची अपेक्षाही केली नव्हती. पण सोशल मीडियावर त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आधी बेट्टा प्रजातीच्या एका माश्यावर अशीच उच्च बोली लावण्यात आली होती. या माश्याच्या डोक्यावर अर्धचंद्र होता.

kasturi cotton
कस्तुरी कॉटन…देशातील सर्वोत्तम कापूस!
Wild dogs were found for the first time in Phansad Sanctuary
फणसाड अभयारण्यात पहिल्यांदा आढळला रानकुत्र्यांचा वावर
bmc will take permission from ec for potholes filling
मुंबई: खड्डे भरण्याच्या कामासाठीही निवडणूक आयोगाची परवानगी घेणार; पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करणार
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार