आज काल प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे सोशल मीडियाचा वापरही वाढला आहे. फेसबुक,व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामनंतर सध्या ‘टिक टॉक अॅप’ने तरुणाईला तर अक्षरश: वेड लावले आहे. थोरामोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत प्रत्येकाच्या फोनमध्ये टिक-टॉक अॅप असल्याचे पाहायला मिळते. टिक-टॉकवरील काही व्हिडीओंमुळे अनेकांना रातोरात स्टार केले आहे. तर काहींचे विचित्र प्रकार पाहून अनेकांना हसू आले आहे. चला पाहूया २०१९ मध्ये सर्वाधिक लाईक आणि व्हायरल झालेले काही टिक-टॉक व्हिडीओ-

लोकप्रिय यू-ट्यूबर डेविड डोब्रिकचा टिक-टॉक व्हिडीओ सर्वात जास्त व्हायरल झाला होता. या व्हिडीओला १७.५ मिलियन ‘लाइक’ मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये हत्तीच्या टूथपेस्टसाठी संशोधन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

माणसांची आणि प्राण्यांची सर्जरी झाल्याचे आपण बऱ्याच वेळा ऐकतो आणि पाहतो सुद्धा. पण फळांची सर्जरी केल्याचे फार कमी लोकांनी ऐकले असेल. व्हायरल झालेल्या या टिक-टॉक व्हिडीओमध्ये केळ्याची सर्जरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. या व्हिडीओवर ३४ हजार लोकांनी कमेंट केल्या आहेत.

व्हायरल झालेल्या या टिक-टॉक व्हिडीओमध्ये एक महिला स्वीमिंग पूलला कटरच्या सहाय्याने फाडण्याचा प्रयत्न करत असते. पण त्यानंतर जे काही घडलं त्याचा या महिलेने देखील विचार नसेल केला. तिच्या या व्हिडीओला ७० लाख लाइक्स असून त्यावर हजारो कमेंट आहेत.

या टिक-टॉक व्हिडीओमध्ये एक मुलगी झुरळाला मारण्यासाठी स्प्रेचा वापर करत असते. पण ते झुरळ मरण्याऐवजी उडायला लागते. त्यानंतर त्या मुलीलीवर ओढावणारी परिस्थिती तुम्हीच पाहा…

एक मुलगा हमिंग बर्डला आपल्या हातावर बसवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओला १५ लाख लाइक्स आहेत.

चप्पलमध्ये शेविंग क्रीम टाकल्याचा हा टिक-टॉक व्हिडीओ प्रचंड व्हायर झाला होता.

बेयर डेयर डेविलचा हा टिक-टॉक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एका माणसाने बाहुल्याचे कपडे परिधान केले असून तो घसरत पायऱ्यांवरुन खाली येत आहे.