जपानमधील एका शहराचे नाव हिंदू देवी ‘लक्ष्मी’च्या नावावर ठेवण्यात आले आहे. शहर हे जपानची राजधानी टोकिओच्या जवळ वसलेलं आहे. रविवारी 12 ऑगस्ट रोजी जपानचे जनरल काउंसलर ताकायुकी कित्गवा यांनी बंगळुरुमद्ये ही माहिती दिली आहे. ते दयानंद सागरमधील पदवी संमारंभाच्या कार्यक्रमात ताकायुकी कित्गवा बोलत होते.

टोकिओजवळ ‘किचयोजी’ शहर आहे. या शहराचे नाव हिंदू देवी ‘लक्ष्मी’च्या नावाने ठेवण्यात आल्याची माहिती ताकायुकी कित्गवा यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, ‘किचयोजी’ म्हणजे ‘लक्ष्मी मंदिर’ असे जपानमध्ये मानतात.

जपानमधील संस्कृती आणि समाजावर भारतीयांचा असलेल्या प्रभावर बोलताना ताकायुकी कित्गवा म्हणाले की, ‘भारत आणि जपानची विचार करण्यात पद्धत वेगळी आहे. तरीही जपानमधील अनेक मंदिरामध्ये हिंदू देवी -देवतांचा वास आहे. जपानमध्ये हिंदू देवी-देवतांना खूप मान आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही हिंदू देवी-देवतांची पूजा करतो. ‘

ताकायुकी कित्गवा म्हणाले की, भारतीय देवी-देवतांचा नव्हे तर येथील भाषेचाही जपानवर प्रभाव आहे. जपानचे ५०० पेक्षा आधिक शब्द संस्कृत आणि तामिळ भाषेमधून घेतले आहेत.