X
X

पहाटे चार वाजता प्रियकाराच्या फिटबीटचे नोटीफिकेशन आलं अन् त्याचं पितळं उघडं पडलं

READ IN APP

हेल्थ बॅण्डमुळे तो अडकला, तिनेच काय घडलं याबद्दलचा किस्सा सांगितला

तंत्रज्ञानामुळे आयुष्य अगदी सोपे झाले आहे. मात्र त्याचवेळी तंत्रज्ञान दिवसोंदिवस स्मार्ट होत असल्यामुळे मानवाचीच गफलत होताना दिसत आहे. असच काहीसं झालं अमेरिकेमधील एका महिला पत्रकाराच्या प्रियकराबरोबर. तिच्या प्रियकराला तिने चक्क फिटबीट या हेल्थ बॅण्डमुळे दुसऱ्या मुलीबरोबर रंगेहाथ पकडलं.

अमेरिकेतील क्रिडा पत्रकार असणाऱ्या जेनी सॅल्टरने स्वत:च हा अनुभव ट्विटवरुन शेअर केला आहे. माझा प्रियकर मला फसवत होता हे त्याच्या फीडबीटमुळे मला समजल्याचे जेनीनं म्हटलं आहे. “माझ्या प्रियकराने एकदा मला नाताळानिमित्त फिटबीट भेट म्हणून दिलं होतं. मला ते खूप आवडलं. व्यायाम करण्यासाठी एकमेकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आम्ही ते एकमेकांच्या डिव्हाइसशी सिंक्रो करुन घेतलं. मात्र अचानक एका रात्री पहाटे चारच्या सुमारास माझ्या प्रियकराची शारीरिक हलचाल वाढल्याचे नोटीफिकेशन मला माझ्या मोबाईलवर आले. हे खरं नसावं अशी माझी अपेक्षा होती. पण ते खरं ठरलं,” असं ट्विट जेनीनं केलं आहे. तिचे हे ट्विट सध्या खूपच चर्चेत असून काही दिवसांमध्ये त्याला ४५ हजारहून अधिक रिट्विट मिळाले आहेत.

अनेकांनी या ट्विटवर रिप्लाय करुन प्रेमामध्ये आपण काय करतो याचे भान ठेवले पाहिजे अशा पद्धतीचे कमेंट केल्या आहेत. या आधीही आशाप्रकारे फिटबीटमुळे पत्नीचा खून करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचा प्रकार अमेरिकेमध्ये घडला होता. चोराने आपल्या पत्नीचा खून केल्याचा बनाव एका व्यक्तीने केला होता. मात्र मृत पत्नीच्या हातावरील फिटबीट अॅक्टीव्हीटीमुळे नवऱ्याचा बनाव उघड झाला आणि त्याला खूनाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती.

20
X