ग्रेटर चेन्नई पोलिसांनी ‘चेन्नई टॉक्स’ नावाचं युट्यूब चॅनल चालवणाऱ्या तिघांना अटक केली आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

चेन्नई टॉक्ससोबत बातचीत करतानाचा एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये ती महिला लैंगिक संभोग, लैंगिकता अशा विषयांवर बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये महिला सेक्स, कामुकता अशा विषयांवर सविस्तर बोलताना दिसते, तर चॅनलचा प्रतिनिधी बाजूला हसताना दिसतो. इंडियाटुडेच्या वृत्तानुसार व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता महिलेने तक्रार केली आहे.

Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
salman khan reaction on shahrukh khan song
Video: घरावरील हल्ल्यानंतर सलमान खान दुबईत, शाहरुख खानचं गाणं वाजताच भाईजानने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
salman khan first post after firing at home
घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानची पहिली पोस्ट, व्हिडीओ केला शेअर
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

‘शो पूर्णतः स्क्रिप्टेड होता आणि व्हिडिओवरील कमेंट डिसेबल केल्या जातील अशी शाश्वती चॅनलकडून देण्यात आली होती. व्हिडिओ अन्य युट्यूब चॅनल्सवर उपलब्ध असल्याचं आणि कमेंट डिसेबल नसल्याचं समजल्यावर धक्का बसला’, असं या महिलेने तक्रारीत म्हटलंय. सेक्स आणि रिलेशनशिपवर खुलेआम बोलत असल्याने व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून सोशल मीडियामध्ये काही नेटकरी तिला शिवीगाळ करत आहेत.

दरम्यान, चॅनलचा मालक दिनेश, व्हिडिओ जर्नलिस्ट अजय बाबू आणि VJ असेन या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. चॅनलचा क्रू बसंत नगर परिसरात उपस्थित असून लोकांना अस्वस्थ करणारे प्रश्न विचारत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांची उपकरणंही जप्त करण्यात आली आहेत. या चॅनलवर बहुतांश व्हिडिओ वॉक्स-पॉप स्टाइलमध्येच असतात, त्यात लोकांना थेट प्रश्न विचारले जातात.

पोलिसांनी आरोपींविरोधात आयपीसी कलम 354(b), 294(b), 509, 506(ii) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.