29 October 2020

News Flash

हातोडीने अंडे तुटेना, कोयत्याने कांदा कापेना; सियाचीनमधील भारतीय जवानांचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये गोठवणाऱ्या थंडीत जवानांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे हे दिसून येत आहे.

दिवसरात्र डोळ्यात तेल ओतून देशाच्या सीमांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपले जवान अगदी चोखपणे पार पाडत असतात. परंतु अशी ही कठिण जबाबदारी पार पाडताना त्यांना निसर्गाच्याही कठिण परिस्थितीचा सामना करावा लागतो. कधी ऊन-पाऊस तर कधी कडाक्याची माणसालाही गोठवणारी थंडी. अशातच सियाचीनमध्ये तब्बल उणे 60 डिग्री तापमानातही भारताच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठीही कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

गोठवणाऱ्या थंडीत त्यांना मिळणारा ज्यूस, खाण्यासाठी मिळणारी अंडी आणि अन्य सामानही गोठून गेल्याचे दिसत आहे. त्यातच हातोड्यानेही अंड फोडण्यास किती कष्ट घ्यावे लागत आहे हेही त्यातून दिसत आहे. नुकताच जवानांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तीन जवान दिसत असून त्यातील एक जवान त्यांना देण्यात आलेला ज्यूसचा डब्बा उघडून तो गोठल्याचे दाखवत आहे. तर हातोडा मारूनही जवान तो गोठलेला ज्यूस तोडण्याचे प्रयत्न करत आहे.

या व्हिडीओमध्ये एक जवान कशाप्रकारचे गोठलेली अंडी खाण्यास मिळत आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर गोठलेले बटाटे, कांदे, टोमॅटो आणि आले हेदेखील तोडण्याचा ते जवान प्रयत्न करताना दिसत आहेत. सियाचीनमध्ये अनेकदा तापमान उणे 70 पर्यंत जात असल्याची माहितीही एका जवानाने या व्हिडीओद्वारे दिली आहे. देशाच्या सर्वाधित उंचीवर असलेल्या सीमेचे रक्षण करताना जवानांना कोणत्या कठिण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, याची झलक यातून पहायला मिळतेय. त्यांना देण्यात आलेल्या फळांच्या ज्यूस मधून बर्फ निघत असल्याचे यात दिसून येत आहे. तसेच तो ज्यूस पिण्यासाठी जवानांना तो उकळून प्यावा लागत असल्याचेही एक जवान सांगताना दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आपले सैनिक किती कठिण परिस्थितीचा सामना करत आहेत. हा व्हिडीओ तथाकथित लिबरल आणि सेक्युलर लोकांना पाठवला पाहिजे, जे सैन्याचे मनोधैर्य खचवण्याची कोणतीही संधी सोडत नाही. तर आणखी एका युझरने सैनिकांचे जीवन किती कठिण आहे याची प्रचिती यातून येत असल्याचे सांगत त्यांच्या शौर्याला वंदन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 9:13 am

Web Title: three soldiers viral video egg potato juice siachen in extreme cold condition jud 87
Next Stories
1 कांद्याची फोडणी देते म्हणून सासूची सूनेविरोधात पोलिसात धाव
2 अनोखा निकाल! पुण्याच्या ‘या’ विद्यार्थ्याला सर्वच विषयांत ३५ गुण
3 रेल्वेकडून प्रवाशांना ‘मसाज’ सेवा; आरामदायी प्रवासासाठी लवकरच नवी सुविधा
Just Now!
X