02 March 2021

News Flash

VIDEO: जेव्हा वाघच करतो बाईकचा पाठलाग

अंगावर काटा आणणार हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे

व्हायरल व्हिडिओ

केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मुथंगा अभयारण्यामधील एक व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती दुचाकीवर या अभयारण्यामधून जाणाऱ्या रस्त्यावरुन जात होते. अचानक एक मोठा वाघ त्यांचा पाठलाग करु लागला. हा सर्व थरारक घटनाक्रम चालकाच्या मागे बसलेल्या व्यक्तीने मोबाइलमध्ये शूट केला आहे.

दुचाकीवरुन दोन जण या अभयारण्यामधून जाताना मागे बसलेल्या व्यक्तीला रस्त्याच्या बाजूच्या झुडपांमधून वाघ त्यांचा पाठलाग करत असतानाचे जाणवले. त्यानंतर चालकाने गाडीचा वेग वाढवला. मात्र काही वेळ हा वाघ चक्क डांबरी रस्त्यावर येऊन या गाडीचा पाठलाग करताना व्हिडिओत कैद झाला आहे.

फेसबुकवरील फॉरेस्ट्स अॅण्ड वाइल्डलाइफ प्रोटेक्श सोसायटी (एफएडब्यूपीएस) या सेवाभावी संस्थेने त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. ही संस्था वन्यजीव संरक्षण आणि जंगलांच्या संरक्षणासाठी काम करते. या व्हिडिओबद्दल अधिक माहिती समोर आली नसली तरी हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार दुचाकीवरील दोघेजण वनखात्यातील अधिकारी होती. या भागामध्ये वाघ दिसल्याची बातमी मिळाल्यानंतर हे अधिकारी या परिसरामध्ये तपासणीसाठी गेले होते त्यावेळी हा प्रकार घडला.

या थरारक घटनेचा हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. मनुष्य  वाघांच्या नैसर्गिक आदीवासामध्ये गेल्यावर असंच होणार अशाप्रकारची मते अनेकांनी या व्हिडिओबद्दल बोलताना व्यक्त केली आहेत. तर काहींनी दुचाकीवरील हे दोघेजण अगदी थोडक्यात बचावल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2019 5:00 pm

Web Title: tiger chases bike rider in kerala watch scary video scsg 91
Next Stories
1 टिकटॉकमुळे सापडला तीन वर्षांपुर्वी सोडून गेलेला नवरा
2 मालकाची जेलमध्ये रवानगी झाल्यानंतर कुत्र्याने पोलीस ठाण्यालाच बनवलं घर
3 विमानातून लपून जाण्याच्या प्रयत्नात ‘तो’ 3500 फुटांवरून पडला
Just Now!
X