भाजपाच्या प्रसिद्ध नेत्या सोनाली फोगट आपल्या टिक-टॉक व्हिडीओमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. परंतु या वेळी सोनाली कुठल्याही प्रकारच्या व्हिडीओमुळे नव्हे तर त्यांना मिळालेल्या धमकीमुळे चर्चेत आहेत. सोनाली यांना त्यांच्या कुटुंबीयांकडूनच जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांची बहिण व भावोजींनी सोनाली यांना धमकी दिली आहे.

सोनाली आपल्या वडिलांची भेट घेण्यासाठी फतेहाबाद येथे गेल्या होत्या. तेथे काही कौटुंबिक कारणावरुन त्यांचे बहिणीबरोबर भांडण झाले. या भांडणादरम्यान भावोजीने जीवे मारण्याची धमकी दिली, असे आरोप सोनाली यांनी केले आहेत. सोनाली केवळ आरोप करुन शांत बसल्या नाहीत. तर त्यांनी बहिण व भावोजींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी कायदेशीर कारवाईची मागणीदेखील केली आहे.

सोनाली फोगट यांनी नुकतीच आदमपूर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस नेते कुलदीप बिश्नोई यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.