भारतात दिवसेंदिवस करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतेय. करोनाच्या धोक्यामुळे लोकं आवश्यक खबरदारी घेत आहेत. लॉकडाउननंतरही देशात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने लोकांमध्ये करोनाबाबत चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. करोना संसर्गाच्या भीतीमुळे लोकं बाहेरील कोणतीही वस्तू घरात आणण्यापूर्वी व्यवस्थित स्वच्छ करतायेत किंवा सॅनिटाइझ करत आहेत. अशातच टिकटॉकवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

या व्हिडिओमध्ये करोनाच्या भीतीमुळे एक मुलगी कोथिंबीर चक्क साबणाने धुवून घेत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकरी हा व्हिडिओ पाहून कोथिंबीर साबणाने स्वच्छ करणाऱ्या मुलीवर खूप हसतायेत. तर काही नेटकरी तिच्यावर टीकाही करत आहेत. करोनामुळे खबरदारी म्हणून एकीकडे लोकं भाज्या गरम पाण्याने धुवून घेत असताना या मुलीने मात्र कोथिंबीर साबणाने धुतली आणि व्हिडिओ पोस्ट केला. कोथिंबीरवर पाणी टाकल्यानंतर साबणाने कोथिंबीर धुताना ती या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ टिकटॉकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

@1993pikachuइस वायरस ने सबको परेशान किया है corona ki dehsat ##coronavirus

♬ original sound – Mehmood J


काही दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड करण्यात आला असून चार कोटींहून अधिक जणांनी तो बघितला आहे. या व्हिडिओवर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. तुम्ही कोथिंबिर वॉशिंग मशीनमध्ये धुतली तर अजून स्वच्छ होईल होईल’ असं एका युजरने म्हटलं आहे. तर अन्य एका युजरने, ‘हे अत्यंत चुकीचं आहे, यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं’ असं म्हटलंय.