News Flash

टीना अंबानींनी दीर मुकेश अंबानींसाठी केलेली पोस्ट व्हायरल; तुम्ही पाहिलीत का?

पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांनी इन्स्टाग्रामला पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये टीना अंबानी यांनी आपले दीर मुकेश अंबानी यांचे दोन फोटो शेअर केले आहे. प्रेमळ मुलगा, भाऊ आणि दीर असा उल्लेख करत त्यांनी मुकेश अंबानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पहिल्या फोटोमध्ये मुकेश अंबानी आपले छोटे बंधू अनिल अंबानी आणि टीना अंबानींसोबत दिसत आहेत. यासोबत टीना अंबानी यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्या मुकेश अंबानींसोबत दिसत आहेत. टीना अंबानी यांनी पोस्टमध्ये मुकेश अंबानींना निरोगी आरोग्य आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tina Ambani (@tinaambaniofficial)

टीना अंबानी यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टला अनेकांनी लाईक केलं असून कमेंट करत मुकेश अंबानी यांना शुभेच्छा देत आहेत.

गेल्या महिन्यात टीना अंबानी यांनी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत फोटो शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tina Ambani (@tinaambaniofficial)

भारतातील आणि आशियातीलही सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी हे जागतिक अब्जाधीशांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत. ८४.५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या मालमत्तेसह त्यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे आपले स्थान परत मिळवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 4:55 pm

Web Title: tina ambani birthday post for brother in law mukesh ambani sgy 87
Next Stories
1 वांगणीमधील पॉईंटमनची थेट रेल्वे मंत्र्यांनी घेतली दखल; म्हणाले, “अभिमान वाटतोय की…”
2 जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बॉक्सरचा Video पाहून आनंद महिंद्रांनी पुढे केला मदतीचा हात; Startup साठी करणार मदत
3 कॅन्सरग्रस्त पत्नीच्या उपचारासाठी १७ वर्ष व्हायोलिन वाजवून केले पैसे जमा; ७७ वर्षाच्या आजोबांची पोस्ट व्हायरल
Just Now!
X