27 October 2020

News Flash

VIDEO: आईसाठी तो आग लागलेल्या इमारतीचे १५ मजले ‘स्पायडरमॅन’प्रमाणे चढला

कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय तो इमारतीवर चढला

फोटो साभार: सीक्स एबीसी न्यूज

अमेरिकेमधील फिलाडेल्फीयामध्ये एक ३५ वर्षीय व्यक्ती आईला वाचवण्यासाठी स्पायडरमॅनप्रमाणे इमारतीवर चढला आणि खाली उतरल्याची घटना कॅमेरात रेकॉर्ड झाली आहे. जर्मेन नावाच्या या व्यक्तीने इमारतीला आग लागली असता आपल्या आईच्या काळजीमुळे स्वत:चा जीव धोक्यात टाकला. या संपूर्ण घटनेचे चित्रिकरण एका वृत्तवाहिनीच्या हॅलिकॉप्टरमधून करण्यात आले आहे.

फिलाडेल्फीया एक्वीररने दिलेल्या वृत्तानुसार, ‘फिलाडेल्फीया हाऊसिंग अथॉरिटी’च्या मालिकीची ‘वेस्टपार्क अपार्टमेंट’ या १९ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. पहिल्या मजल्यावर भंगाराच्या खोलीत लागलेली ही आग हळूहळू परसली. त्यामुळे इमारतीमध्ये राहणारी अनेक कुटुंब आणि वयस्कर लोक अडकून पडले. आगीने भीषण रुप धारण केल्यामुळे धुराचे लोट उठू लागले. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील अनेकांची सुखरुप सुटका करण्यात आली तरी त्यापैकी काहीजणांना धुराचा प्रचंड त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. मात्र बचावकार्य सुरु असतानाच एक व्यक्ती इमारतीच्या बाहेरच्या भागावरुन खाली उतरताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिसली. ही व्यक्ती होती जर्मेननी.

सीक्स एबीसी या वेबसाईटशी बोलताना जर्मेनने ६५ वर्षीय आईचा जीव वाचवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट होते, असे सांगितले. १५ व्या मजल्यावर असणाऱ्या आपल्या घरात आई आकडकल्याचे समजल्यानंतर जर्मेनने इमारतीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी त्याला आग लागलेल्या इमारतीमध्ये शिरण्यास मज्जाव केला.

‘इमारतीला आग लागली हे मला आईऩे मला फोन करुन सांगितले. मी जेव्हा इमारतीखाली पोहचलो तेव्हा इमारतीच्या लिफ्ट बंद असून तू आज जाऊ शकत नाही असं मला पोलिसांनी सांगितले. मी त्यांना पाऱ्यांनी वर जाणार असल्याचे सांगितले. मात्र त्यालाही त्यांनी नकार दिला. मग मी काहीही करुन आईला वाचवण्याचा निश्चय केला. आई खूप वयस्कर असून ती आजारी होती. आई एकटीच बेडवरुन उठून चालू शकत नसल्याने तिला मदतीशिवाय बाहेर येणे शक्य नव्हते. आईला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मी इमारतीवर चढण्यास सुरुवात केली. मला माझ्या सुरक्षेची काळजी नव्हती. त्यावेळी मला डोळ्यासमोर केवळ आईच दिसत होती,’ असं जर्मेनने सांगितले.

जर्मेन १५ व्या मजल्यापर्यंत आपल्या घरच्या गॅलरीमध्ये पोहचला. त्यावेळी त्याच्या आईने ‘मी ठीक असून आग नियंत्रणात आली आहे’ असं त्याला सांगितले. आईला सुखरुप बघून जर्मेनचा जीव भांड्यात पडला. मात्र बाहेर असणाऱ्या पोलिसांना मी इमारत चढून आल्याचे समजल्यास ते मला अटक करतील अशी भिती वाटल्याने जर्मेनने पुन्हा बाल्कनीमधून आल्या मार्गे खाली उतरण्याचे ठरवले आणि तो इमारतीच्या बाहेरच्या बाजूनेच खाली उतरला. विशेष म्हणजे कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय आणि दोरखंडांची मदत न घेता तो इमारतीवर चढला आणि खाली उतरला. खाली उतरल्यानंतर पोलीस अधिकारी त्याला अटक करतील असं वाटलं होता. मात्र एकंदरित परिस्थिती बघता पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिले.

जर्मेन हा इमारत बांधकाम करण्याच्या ठिकाणी कामगार म्हणून नोकरीला आहे. त्यामुळेच त्याला इमारतींच्या रचनेची चांगली माहिती आहे. म्हणूनच त्याला या इमारतीवर अशाप्रकारे चढता आल्याचे तो सांगतो. ‘माझ्या नोकरीमध्ये मला इमारतींवर चढण्याचा अनुभव असल्याने त्याचा फायदा मला इथे झाला,’ असं जर्मेनने सांगितले.

ट्विटवर अनेकांनी जर्मेनची स्तुती केली आहे.

पीटर पारकर

कठीण काम आरामात केले

श्वास रोखून धरला

भारी एकदम

याला स्पायडरमॅन सिनेमात घ्या

दरम्यान, जर्मेनने अग्निशमन दलामधील नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र त्या अर्जाचे पुढे काहीच झालं नाही असं जर्मेनने मुलाखतीमध्ये आवर्जून सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 2:52 pm

Web Title: to save his mother man scales burning building then climbs down 15 storeys without safety gear scsg 91
Next Stories
1 महिलांची अंतर्वस्त्रं चोरण्यासाठी वृद्धाचा १०० किमी प्रवास
2 Amazon Sale: अन् ग्राहकांनी 6,500 रुपयात खरेदी केली तब्बल 9 लाखांची कॅमेरा लेन्स
3 Video : जेव्हा अमेरिकेची टेनिसपटू स्वतःच्या लग्नात बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकते
Just Now!
X