टोक्यो ऑलिम्पिकमध्ये १२ व्या दिवसाला भारताने अगदी छान सुरुवात केली. भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने आपल्या पहिल्याच प्रयत्नात थेट अंतिम फेरीत धडक मारली आहे. बुधवारी पार पडलेल्या अ गटातील पात्रताफेरीमधील कामगिरीच्या जोरावर नीरजला थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आलाय. कामगिरीच्या आधारे ऑटोमॅटिक क्वालिफिकेशनच्या नियमांनुसार थेट अंतिम फेरीत पोहचला. नीरजने केलेल्या या भन्नाट कामगिरीनंतर त्याचं एक जुनं ट्विट व्हायरल होत आहे.

नीरजने पात्रता फेरीमध्ये फेकलेला भाला तब्बल ८६.६५ मीटरपर्यंत गेला आणि तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अ गटामध्ये नीरज १५ व्या स्थानी होता. विशेष म्हणजे नीरजने ही कामगिरी पहिल्याच प्रयत्न केली. पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये ८३.५० मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या किंवा सर्वोत्तम १२ खेळाडूंना प्रवेश अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो. मात्र असं असलं तरी नीरजला या सर्वाची चिंता करण्याची गरज नाही. कारण नीरजने पहिल्या अटीनुसार म्हणजे ८३.५० पेक्षा अधिक लांब भाला फेकत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.

नक्की पाहा हे फोटो >> भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकांचं एका महिन्याचं मानधन पाहून चक्रावून जाल

नक्की पाहा हे फोटो >> “सरकार त्याचं लग्न होऊ देणार नाही”; ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूच्या आईला मुलाच्या संसाराची चिंता

नीरजच्या या कामगिरीनंतर त्याचं १५ नोव्हेंबर २०१७ चं एक ट्विट व्हायरल झालं आहे. “जेव्हा यशची इच्छा तुम्हाला झोपू देत नाही, जेव्हा मेहनतीशिवाय तुम्हाला काहीच चांगलं वाटत नाही, जेव्हा सतत काम करुनही तुम्हाला थकवा जाणवत नाही तेव्हा समजून जा की तुम्ही यशाचा नवा इतिहास रचणार आहात,” असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आता नीरजच्या याच ट्विटखाली काहींनी त्याने भालाफेकमध्ये केलेल्या कामगिरीचा व्हिडीओ पोस्ट करत त्याला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्यात. ऑलिम्पिक स्टेडियममध्ये ७ ऑगस्ट रोजी पुरुष भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. मंगळवारी भारताच्या अन्नू राणीला पात्रता फेरीमध्ये चांगली कामगिरी करता न आल्याने ती स्पर्धेबाहेर फेकली गेली.

नक्की पाहा >> ऑलिम्पिकमधील एक मेडल ‘या’ गावाचा चेहरामोहरा बदलू शकतं

भारताने यंदा आपला ऑलिम्पिकमधील सर्वात मोठा चमू पाठवला असून त्यात १२७ खेळाडूंसह २२८ सदस्यांचा समावेश आहे. भारताला आतापर्यंत यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तीन पदकं निश्चित झाली आहेत. यामध्ये वेटलिफ्टींगपटू मिराबाई चानूने पटाकवलेलं रौप्य पदक, बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या कांस्यपदकासहीत भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने बुधवारी झालेल्या सामन्यात कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. टोक्योमध्ये भारताचे १२७ खेळाडू १८ क्रीडा प्रकारांत सहभागी झालेत.