News Flash

‘गाड्यांची तिसरी लाट’ : कोविड निर्बंध कमी करताच हिमाचलमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा

सरकारने आरटी-पीसीआर चाचणीनंतर हिमाचल प्रदेशात पर्यटकांना येण्यास परवानगी दिली आहे.

ट्रॅफिक जामचा व्हिडिओ व्हायरल होताच ट्विटरवर प्रतिक्रिया उमटल्या

गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेश सरकारने कोविड -१९वरील निर्बंध कमी केल्यामुळे पर्यटक शिमला येथे दाखल होत आहेत. रविवारी सोलन जिल्ह्यातील परवानू सीमेवर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. पोलिसांनी इतर राज्यातून आलेल्या प्रवाशांच्या ई-पासची तपासणी करण्यासाठी वाहने थांबवली होती.

कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्याने सरकारने आरटी-पीसीआर चाचणीनंतर हिमाचल प्रदेशात पर्यटकांना येण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर पर्यटकांमध्ये अचानक वाढ झाली आहे. तरीही, अद्याप प्रवासासाठी राज्यात कोविड ई-पास आवश्यक आहे.

Reposted from @ndtv As soon as Himachal Pradesh announced that COVID-19 RT-PCR negative tests are no longer required to enter the state, hundreds of cars were seen on the road leading up to the state#Himachal #HimachalPradesh #Traffic #TrafficJam #RTPCRTest #Covid19 pic.twitter.com/QP9k7QASKx

— Monowar Hussain (@Monowartlp) June 13, 2021

पर्यटकांमुळे झालेल्या ट्रॅफिकचा व्हिडिओ व्हायरल होताच ट्विटरवर प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी ‘पर्यटकांबद्दल चिंता’ व संताप व्यक्त केला, तर इतरांनी याबाबत मीम्स शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

राज्यात संध्याकाळी ०५.०० ते पहाटे ०५.०० पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे, तर कलम १४४ रद्द करण्यात आला आहे. ५० टक्के क्षमतेसह सार्वजनिक वाहतुकीला परवानगी आहे. १४ जूनपासून सकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत दुकाने सुरु असतील.

राज्यात १३ जूनला ३७० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार ५,४०२ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात एकूण मृत्यूची संख्या ३,३६८ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 8:56 pm

Web Title: tourism himachal pradesh traffic jam after covid 19 restrictions abn 97
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 Video : जोकोव्हिचच्या कृतीमुळे ‘त्या’ मुलाला आनंदाने वेडच लागायचंच बाकी होतं
2 ‘बाबा का ढाबा’चे मालक पुन्हा व्हायरल, म्हणाले…“चोर नव्हता फूड ब्लॉगर”
3 Video : मुंबईत घरासमोर पार्क केलेली कार बुडाली; व्हिडीओ व्हायरल, मीम्सचा धुमाकूळ
Just Now!
X