News Flash

Viral Video : हा पर्वत चढण्यासाठी फार हिंमत लागते बुवा!

भल्याभल्यांना फुटतो घाम

(छाया आणि व्हिडिओ सौजन्य : People’s Daily, China/Facebook)

तुम्हाला ट्रेकिंगची किंवा थरार अनुभवण्याची आवड आहे का? तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. ज्यांना थ्रिल अनुभवायला आवडतं अशा ट्रेकर्सच्या यादीत या ट्रेकचं नाव तर असतंच किंवा आयुष्यात एकदा तरी इथे जाण्याची इच्छा अनेकांना असते.

हजारो फूट उंच पर्वत रांगा, सोसाट्याचा वारा, दोन्ही बाजूला खोल दरी आणि हा पर्वत पार करण्यासाठी असलेला बेभरवशाचा पूल.. असं चित्र पाहायला मिळतं चीनच्या हुअॅसँग पर्वतावर. या पर्वतावर चढणं काही सोपी गोष्ट नाही. या पुलावरून चालत जाताना भल्याभल्यांना घाम फुटतो. एक छोटीशी चूक आणि खेळ खल्लास. अवघड रस्ता, खाली हजारो फूट खोल दरी पाहूनच हात पाय थरथरू लागतात. तरीही येथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी काही कमी होत नाही.

जगातील सर्वात धोकादायक असा हा ट्रेक आहे, पण तरीही आयुष्यात एकदा तरी हे थ्रिल अनुभवण्यासाठी काही पर्यटक तो पार करण्याचं धाडस करतात. काही जणांचा जीवही जातो पण तरीही याठिकाणी असणारी लोकांची गर्दी काही कमी होत नाही. नुकताच या पर्वतावर चढतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर काही पर्यटकांनी शेअर केलाय. हा व्हिडिओ पाहून आपल्याही अंगावर भीतीनं काटा उभा राहतो. तेव्हा तो पार करणाऱ्या पर्यटकांची काय अवस्था झाली असेल हे वेगळं सांगायला नको..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 11:20 am

Web Title: tourists climb famous huashan mountains in huayin district
Next Stories
1 या कुटुंबातील तीन पिढ्या पायलट
2 Viral Video : अरे हे तर भित्र्या सशाच्या गोष्टीसारखंच झालं!
3 तुम्हीही ‘Sarahah’ वापरता? मग हे जरूर वाचा
Just Now!
X