News Flash

करोना निर्बंध मोडणाऱ्या पर्यटकांनी पोलीस स्टेशनमध्येच केली ‘जेल पार्टी’; Video झाला व्हायरल

करोना नियमांचं उल्लंघन केल्याने ११० जणांना झाली होती अटक

(फोटो सौजन्य : व्हायरल प्रेस)

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थायलंडमध्ये काही ब्रिटीश आणि अमेरिकन पर्यटकांनी पोलिसांनी अटक केली. मात्र त्यावहून धक्कादायक बाब म्हणजे या पर्यटकांना अटक करुन पोलीस स्थानकात नेल्यानंतर हे पर्यटक तिथेच दंगा मस्ती करत नाचू, गाऊ लागले. पोलीस स्थानकामध्ये परदेशी पाहुण्यांनी अटक झाल्यानंतर केलेल्या या पार्टीचे व्हिडीओ सध्या थायलंडमध्ये चर्चाचा विषय ठरले आहेत.

नक्की पाहा >> Photos : …म्हणून ‘या’ देशात परदेशी पर्यटकांना रस्त्यावर, फुटपाथवर मारावे लागतायत Push-Ups

थायलंडमध्ये करोनाबाधितांची वाढती संख्या पाहता कठोर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. देशामध्ये रात्री नऊ वाजल्यानंतर बार बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र कर्फ्यू लागू झाल्यानंतरही पार्टी सुरु असल्याचे पोलिसांना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून समजल्यानंतर त्यांनी या बारवर धाड टाकून काही पर्यटकांना अटक केली. पोलिसांना या पार्टीच्या ठिकाणी धाड टाकली तेव्हा एकच गोंधळ उडाला. अंधाराचा फायदा घेऊन येथील अनेक पर्यटकांनी पळ काढला. तर काहीजण पोलिसांच्या हाती लागले.

नक्की वाचा >> करोनामुळे पुरुषांच्या शुक्राणूंवर होतो परिणाम; प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होण्याची भीती

एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी या ठिकाणी ११० जणांना अटक केली. त्यापैकी ८९ जण हे १० हून अधिक देशांमध्ये आलेले परदेशी पर्यटक होते. पोलिसांनी या सर्वांना अटक केली तेव्हा ते दारुच्या नशेत होते. या सर्वांना गाड्यांमधून पोलीस स्थानकात घेऊन जाण्यात आलं. मात्र तिथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु असतानाच ते पोलीस स्थानकात नाचू लागले. करोनासंदर्भातील सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम न पाळता ये पर्यटक पोलीस स्थानकातच धुडगूस घालू लागले.  तुरुंगामध्येच टेबलवर पडून चाणारे, धुम्रपान करणारे आणि जोरात गाणी लावून गोंधळ घालणाऱ्या या पर्यटकांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अनेक महिला पर्यटक गाणी लावून नाचताना दिसत आहे. काही जण इट्स अ जेल पार्टी यो असं ओरडतानाही दिसत आहेत.

यासंदर्भात पोलीस अधिकारी असणाऱ्या सुपारीक पॅनकोसोल यांनी एपीला दिलेल्या माहितीनुसार, “येथे जवळजवळ सर्वच ठिकाणी नियम पाळले जात असताना कारवाई करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र नियमांचं उल्लंघन होत होतं. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने आयोजकांवरही कारवाई केली जाणार आहे.” सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये समुद्रकिनारी असणाऱ्या या बारमध्ये अनेकजण गर्दी करुन नाचत असल्याचे दिसल्यानंतर या बारवर पोलिसांनी कारवाई केली.

नक्की वाचा >> PPE सूट फाडून नर्सने करोना रुग्णासोबत केला सेक्स

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या खटल्याची सुनावणी स्थानिक न्यायालयाने केली आहे. न्यायालयाने सर्वांना एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर ही शिक्षा रद्द करुन सर्व पर्यटकांना एका वर्षाच्या प्रोबेशन पिरिएडची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र पर्यटकांनी नियम पाळले तर यासंदर्भात फेरविचार केला जाईल असंही न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच न्यायालायने प्रत्येक पर्यटकाला १३० डॉलरचा म्हणजेच नऊ हजारांहून अधिक रुपयांचा दंड ठोठावला आहे.

नक्की वाचा >> सेक्स करताना झाला त्याचा मृत्यू; शवविच्छेदनामधून समोर आली धक्कादायक माहिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 3:55 pm

Web Title: tourists party at police station in thailand after being arrested for flouting covid 19 rules scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अविस्मरणीय… चंद्र प्रकाशातील इंद्रधनुष्य ठरतंय चर्चेचा विषय; जाणून घ्या कुठून दिसलं दृष्य
2 या फोटोत किती बदकं आहेत?; हजारो जणांनी केलाय उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्हाला जमतंय का बघा
3 बापरे…! ११ वर्षांचा मुलगा YouTube वर व्हिडिओ बघून शिकला हॅकिंग, नंतर वडिलांनाच अश्लील फोटो…
Just Now!
X