News Flash

Viral Video : नाद खुळा… शेतकऱ्याची ट्रॅक्टर व्हीली पाहून थक्क व्हाल

ट्रॅक्टरचे राजे अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ व्हायरल होतोय

दिल्लीत राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनाप्रमाणे मंगळवारी राजधानीच्या परिघावर शेतकऱ्यांचे ‘पथसंचलन’ होणार असून त्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाकडे देशाचे लक्ष लागले आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला असला तरी, मोर्चात फक्त ५ हजार ट्रॅक्टर व तितच्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तीनही मोर्चे दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत काढले जातील. सोशल नेटवर्किंगवरही या ट्रॅक्टर रॅली संदर्भात अनेक व्हिडीओ आणि पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. अशाच एका पोस्टमध्ये एक जण चक्क ट्रॅक्टरवर व्हिली मारताना दिसत आहे.

रविंद्र सिंग नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केलेल्या या ११ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये एक पंजाबी तरुण ट्रॅक्टरवर स्टंटबाजी करताना दिसत आहे. “प्रिय दिल्लीकरांनो तयार व्हा ट्रॅक्टरचे राजे तुमच्या भेटीला येत आहेत,” अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओत एक तरुण ट्रॅक्टर रिव्हर्स घेऊन तीला थेट मागच्या दोन चाकांवर उभा करताना दिसतो. त्यानंतर पुढील दोन चाकं हवेतच ठेऊन हा तरुण जागेवर ट्रॅक्टर फिरवतो.

मोर्चामध्ये घातपात होण्याची शक्यता

आठवड्याभरातील चर्चेच्या पाच फेऱ्यांनंतर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चांना परवानगी दिली असली तरी या मोर्चामध्ये घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव राजपथावरील पथसंचलन संपल्यानंतर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा सुरू होईल. या ट्रॅक्टर मोर्चासाठी दिल्लीच्या सीमांवरील सर्व अडथळे काढले जातील. त्यानिमित्ताने गेले दोन महिने दिल्लीच्या वेशींवर आंदोलन करणारे शेतकरी दिल्लीत प्रवेश करतील, अशी माहिती स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी दिली.

पोलिसांकडून दक्षता

दिल्लीच्या आऊटर रिंगरोडवरून मोर्चा काढण्यास परवानगी देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली होती मात्र, दिल्ली पोलिसांनी ती नाकारली. ‘शेतकरी नेत्यांच्या सहमतीने ट्रॅक्टर मोर्चासाठी तीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. काही देशविघातक घटक या मोर्चाला धोका पोहोचवू शकतात. त्यामुळे दक्ष राहण्याची गरज आहे’, असे दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी सोमवारी शेतकरी नेत्यांशी झालेल्या चच्रेनंतर पत्रकारांना सांगितले. पाकिस्तानात १३ ते १८ जानेवारी या पाच दिवसांत ३०० ट्विटर खाती तयार करण्यात आली असून समाजमाध्यमांच्या आधारे अफवा पसरवून ट्रॅक्टर मोर्चामध्ये अडथळे निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी माहिती ‘आयबी’ युनिटचे आयुक्त दिपेंदर पाठक यांनी दिली.

जय्यत तयारी

शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर मोर्चाची जय्यत तयारी केली असून सिंघू, टिकरी व गाझीपूर या तीन आंदोलनस्थळावरून तीन ट्रॅक्टर मोच्रे निघतील. या तीनही मोर्चाचे मार्ग ठरवण्यात आले असून ते प्रत्येकी ६२ ते ६८ किमी अंतर पार करून आंदोलनाच्या मूळ ठिकाणी परत जातील. या मार्गावर ट्रॅक्टर संचलनाचे पूर्ण नियोजन करण्यात आले असून सुमारे ३ हजार स्वयंसेवक मदतीसाठी शेतकरी संघटनांच्या वतीने तनात केले जातील. प्रत्येक ट्रॅक्टरवर जास्तीत जास्त पाच व्यक्ती असतील. त्यांनी चोवीस तासांसाठी शिदोरी घेऊन येण्याची सूचना केली आहे. मद्य बाळगण्यास व सेवनास मनाई केली असून मोठे फलक नेण्याचीही परवानगी नसेल. प्रत्येक मोर्चासाठी शेतकरी संघटनांकडून स्वतंत्र व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यात ४० सदस्य असून डॉक्टर, सुरक्षा रक्षक, समाजमाध्यम व्यवस्थापक यांचा समावेश असेल. ४० रुग्णवाहिन्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चाचे नेतृत्व शेतकरी नेते करणार असून त्यांच्या मागून ट्रॅक्टर मोर्चा निघेल. ट्रॅक्टरवर तिरंगा असेल, लोकगीते आणि देशभक्ती गीते वाजवली जातील. पंजाब, हरियाणा तसेच, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड अशा विविध राज्यांतून शेतकरी ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 8:47 am

Web Title: tractor parade on 26 jan tractor wheelie video goes viral scsg 91
Next Stories
1 Video : …म्हणून त्याने ३०० किमीहून अधिक अंतर ट्रॅक्टर Reverse Gear मध्ये चालवत केलं पार
2 Video : बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या नोटांना लागली वाळवी; दोन लाख किंमतीच्या नोटा फस्त
3 ‘गावानं नाकारलं पण…देश स्वीकारणार’, फक्त १२ मतदारांचे मानले जाहीर आभार; पराभूत उमेदवाराचे अजब बॅनर
Just Now!
X