20 November 2019

News Flash

वाहतूक पोलिस म्हणतो “अपना टाइम आएगा”; जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम

वाहतूक पोलिसाचे हे रॅप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

रणवीर सिंग आणि आलिया भट यांचा गली बॉय चित्रपटातील अपना टाइम आयेगाहे गाणे चांगलेच गाजले होते. या गाण्याच्या धर्तीवर अनेकांनी अपापली रॅपोही तयार केली. आता याच गाण्यावर एका वाहतूक पोलिसाने रॅप तयार केलं आहे. वाहतूक पोलिसाचे हे रॅप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संदीप शाही असे त्या वाहतूक पोलिसाचं नाव आहे. नेटकऱ्यांकडून संदीप शाही यांच्या या रॅपला चांगला प्रतिसाद मिळत असून नेटीझन्सनी त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.

संदीप शाही दिल्लीमध्ये वाहतूक पोलिसांत कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या हटके अंदाजामध्ये रॅप साँग केलं आहे. या रॅपद्वारे त्यांनी वाहतूक नियम आणि महत्व समजावून सांगत लोकांची जनजागृती केली आहे.

 

वाहतुकीचे, हेल्मेट, सीटबेल्ट यांचे नियम पाळले तर आपल्या जीवनाची नक्कीच सुरक्षा होऊ शकते. हे सर्व जर नियम आपण पाळले नाहीत तर नक्कीच आपल्याला वाईट प्रसंगाला तोंड द्यायला लागू शकते असा संदेश त्याने आपल्या रॅप मधून दिला आहे. संदीप शाही यांनी तयार केलेल्या रॅपचा उद्देश लोकांना रहदारीबद्दल जागरूक करणे आहे.

शाही यांनी आणखी एका अनोख्या मोहिमेव्दारे या लोकांमध्ये जनजागृती केली आहे. दिल्ली येथे सिग्नल जवळ उभे असताना बाईकवरील लोकांना आरसा दाखवत होता. त्यातून रस्त्यावर सुरक्षा नियमांचे पालन केले पाहिजे यावर भर द्या असा संदेश देत होता.

First Published on June 20, 2019 5:12 pm

Web Title: traffic police rap apna time aayega ranveer singh gully boy traffic awareness abn 97
Just Now!
X