सुदीप रॉय या वाहतूक पोलिसाची आपल्या कामाप्रतीची निष्ठा पाहून सगळेच भारावून गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी कर्तव्य बजावत असताना त्यांना अपघात झाला. अपघातात त्यांनी एक पाय गमावला, खरंतर सगळंच संपलं होतं. पण सुदीप यांचं मन हार मानायला तयार नव्हतं, म्हणून गेल्या काही दिवसांपासून प्रोस्थेटिक पाय लावून चालण्याचा ते सराव कराव करत आहेत. २०१८ पासून ते कोलकाता वाहतूक पोलीस दलाच्या सेवेत पुन्हा रूजू होणार आहेत.

जाणून घ्या चीड आणणाऱ्या ‘या’ व्हायरल फोटोमागचं सत्य

२०१४ मध्ये ते वाहतूक पोलीस दलात रूजू झाले. ७ जून २०१७ मध्ये कर्तव्य बजावत असताना बसची धडक त्यांना बसली. अपघातात त्यांच्या उजव्या पायावरून बस गेली. या गंभीर अपघातात त्यांनी आपला एक पाय कायमचा गमावला. पण या धक्क्यातून त्यांनी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला आणि एका पायावर चालण्याचा ते सराव करू लागले. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी प्रोस्थेटिक लेग बसवून घेतला. त्यानंतर त्यांचं रितसर प्रशिक्षण सुरू झालं. आता सुदीप कृत्रिम पायाच्या साह्यानं चालू शकतात. जिनाही चढू-उतरू शकतात. इतकंच नाही तर आपली दुचाकीही चालवू शकतात. त्यांना आणखी सरावाची गरज आहे. सराव पूर्ण झाला की फेब्रुवारी २०१८ पासून ते आपल्या सेवेत पुन्हा रूजू होऊ शकतात असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Video : हा ठरला यूट्युबवर सर्वाधिक पाहिला गेलेला दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ

पहिल्यापासूनच वाहतूक पोलीस दलात रूजू व्हावं, असं सुदीप यांचं स्वप्न होतं. एक पाय गमावला तरी त्यांना आपलं स्वप्न अधुरं ठेवायचं नव्हतं. म्हणूनच पाय गमावल्यानंतरही त्यांनी आपले प्रयत्न थांबवले नाहीत. कामाप्रती त्यांची निष्ठा आणि जिद्द पाहून कोलकाता पोलिसांनी त्यांना पांठिबा देत सेवेत परत रुजू होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.