News Flash

America’s Got Talent : अन् ती थोडक्यात वाचली, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

मेरीला त्यानं झेलण्याचा प्रयत्न केला मात्र अंदाज न अल्यानं टेसीच्या हातून मेरीची पकड सुटली आणि काही फुटांवरून ती खाली जमिनीवर आदळली.

America's Got Talent या रिअॅलिटी शोमध्ये नुकताच एका जोडप्यानं ट्रपिझ अॅक्ट सादर केला.

ट्रपिझ अॅक्ट हा सर्वात कठीण प्रकार मानला जातो. आतापर्यंत मोठमोठ्या सर्कशीत हा प्रकार पाहायला मिळला. हा प्रकार करताना ट्रपिझ आर्टीस्टचा खरा कस पणाला लागतो, संतुलन बिघडलं तर जीवाला धोका अधिक असतो. America’s Got Talent या रिअॅलिटी शोमध्ये नुकताच एका जोडप्यानं ट्रपिझ अॅक्ट सादर केला. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मेरी आणि टेसी या जोडप्यानं एजीटीच्या मंचावर हा अॅक्ट सादर करण्याचं ठरवलं. परीक्षकांसह प्रेक्षकही श्वास रोखून हा प्रकार पाहत होते. मेरी आणि टेसीच्या प्रत्येक प्रकारात प्रेक्षकांच्या काळजाची धडधड वाढत चालली होती. मेरीची आई तिच्या २ वर्षांच्या मुलाला घेऊन उपस्थित होती. मात्र अॅक्ट सुरू झाल्यानंतर काही वेळानं टेसीनं डोळ्याला पट्टी बांधली आणि मेरीला झेलण्याचा प्रयत्न केला मात्र अंदाज न अल्यानं टेसीच्या हातून मेरीची पकड सुटली आणि काही फुटांवरून ती खाली जमिनीवर आदळली. काळजाचा ठोका चुकवणारा हा क्षण होता. सुदैवानं मंचावर अधिच मॅट अंथरल्यानं मेरीला गंभीर दुखापत झाली नाही. हा प्रकार पाहून प्रेक्षकच काय पण परीक्षकही काही सेकंदासाठी सुन्न झाले होते. टेसी आणि मेरीला आपला अॅक्ट पूर्ण करता आला नाही, मात्र त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली.

खरं तर एखादा स्पर्धेक अॅक्ट पूर्ण करू शकला नाही तर त्याला बाद करण्यात येते मात्र टेसी आणि मेरीचं धाडस आणि यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत पाहता त्यांना पुढच्या फेरीत प्रवेश देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 12:48 pm

Web Title: trapeze artist america got talent stunt went wrong
Next Stories
1 बडे दिलवाला! ख्रिस्तियानो रोनाल्डोनं हॉटेल कर्मचाऱ्यांना दिली १६ लाखांची टिप
2 जगप्रसिद्ध ‘बर्बरी’ ब्रँडनं जाळून टाकले तब्बल २५६ कोटींचे कपडे आणि अॅक्सेसरीज्
3 आई वडिल मूकबधिर असूनही मुलाने संघर्ष करत गाठले यशाचे शिखर
Just Now!
X