03 March 2021

News Flash

फेकन्युज : अनुपम खेर यांची ‘फॉरवर्ड’गिरी

बॉलीवूडची महानायिका श्रीदेवी यांच्या आकस्मिक मृत्यूमागील कारणे काहीही असतील.

बॉलीवूडची महानायिका श्रीदेवी यांच्या आकस्मिक मृत्यूमागील कारणे काहीही असतील. तो शोधण्याचे बालिश प्रकार वृत्तपत्रांनी केलेही. परंतु ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर आलेल्या ‘पोस्ट’ची कोणतीही शहानिशा न करता ‘आली ‘पोस्ट’ की फॉरवर्ड’ या नेहमीच्याच सवयीने पुढे ढकलली. ‘‘तुर्कस्थानमधील इस्तंबूलमधील कुठल्या तरी ‘कॉफी’च्या दुकानातील कलाकाराने श्रीदेवीला श्रद्धांजली अर्पण केली आहे’’, असे ‘ट्वीट’ खेर यांनी नंतर केले.  कपातील कॉफीच्या पृष्ठभागावर फेसाळलेल्या दुधाने म्हणजेच काहीशा क्रिमच्या साहाय्याने श्रीदेवी यांचं चित्र म्हणजेच ‘लाते आर्ट’ अनुपम खेर यांनी ‘शेअर’ केलं, परंतु प्रत्यक्षात ते चित्र श्रीदेवी यांचं नाही, तर गेल्या वर्षी महिला दिनाच्या निमित्त दक्षिण आफ्रिकेतील डर्बनमधील ग्लोरिया जीन्स कॅफेमधील कलाकाराने ती कलाकारी सादर केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 1:45 am

Web Title: tribute to sridevi by istanbul coffee maker anupam kher
Next Stories
1 मोबाइलचे डॉक्टर
2 न्यारी न्याहारी : काकडी कूलर
3 भारतातील तंत्रक्रांती
Just Now!
X