03 December 2020

News Flash

अंत्ययात्रेसाठी सोन्याची शवपेटी, मृतदेहावर ६५ लाखांचं सोनं आणि बरंच काही

व्यावसायिकाचा गेल्याच आठवड्यात मृत्यू झाला होता

गेल्या आठवड्यात झालेल्या वादविवादातून त्याची हत्या करण्यात आली.

त्रिनिदादमधल्या व्यवसायिकाच्या अंत्ययात्रेसाठी चक्क सोन्याची शवपेटी तयार करण्यात आली होती. गेल्याच आठवड्यात त्याची कुटुंबिंयांसमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. शेरॉन सुखेइदो हा त्रिनिदादमधला बांधकाम व्यवसायिक होता. सोन्यांच्या दागिन्यांची त्याला प्रचंड हौस होती. त्यामुळे नखशिखान्त सोन्याच्या दागिन्यानं तो सतत मढलेला असायचा. त्याच्या अंगावर असलेल्या कित्येक किलो वजनाचे दागिने येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घायचे.

गेल्या आठवड्यात झालेल्या वादविवादातून त्याची हत्या करण्यात आली. आठवडाभर त्यांच्या कुटुंबियांना त्याचा मृतदेह अंतिम संस्कार न करताच ठेवला होता. या आठवड्यात त्याच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचा मृतदेह ठेवण्यासाठी सोन्याचा मुलामा दिलेली शवपेटी खास तयार करण्यात आली. तसेच त्याच्या मृतदेहावर ६५ लाखांचे दागिनेही चढवण्यात आले होते. इतकंच नाही तर त्याचे महागडे शूजही शवपेटीमध्ये ठेवण्यात आले होते.

वाचा : वर्षभरापूर्वी मृत पावलेल्या भावाला घेऊन ‘तो’ रात्रभर सायकलवरुन हिंडला

ही माया त्यानं चुकीच्या मार्गानं कमावली होती त्यामुळे ती त्याच्यासोबत निघून गेली पाहिजे म्हणूनच त्याच्या मृतदेहावर लाखोंचे दागिने चढवल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. तर काहींनी मात्र त्याचं सोन्यावर विशेष प्रेम असल्यानं हे दागिने शवपेटीत ठेवल्याचं म्हटलं आहे. आता त्यामागंच कारण काहीही असलं तरी अंत्ययात्रेत मृतदेह सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेलं आताच्या काळात क्वचितच कोणी पाहिलं असेल म्हणूनच याची जास्त चर्चा होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 1:30 pm

Web Title: trinidadian man funeral in a gold casket and wearing 65 lakh jewellery
Next Stories
1 काळवीट शिकार : एक असा आरोपी, ज्याला २० वर्षांनंतरही नाही पकडू शकले पोलीस
2 वयस्कर पुरुषांना केवळ तरुण मुलीच नाही तर ज्येष्ठ महिलाही आवडतात
3 …तर जेलमध्ये आसाराम बापूसोबत राहणार सलमान खान !
Just Now!
X