भाजप सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी न सोडणा-या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर आता नेटीझन्स खूपच खुश झालेत बुवा ! इतके खुश की सरकारवर विनोदी टिका टिपण्ण्या करणा-या अनेक विनोदी गटाने केजरीवलांना आपल्या समूहात सहभागी होणाचे निमंत्रण पाठवले आहे. हे करण्यामागचे कारण म्हणजे केजरीवलांचे एक ट्विट. या ट्विटमध्ये त्यांनी आरएसएसचा फुल फॉर्म राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसून तो रिलायन्स स्वयंसेवक संघ आहे असे म्हटले होते. आता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे हे ट्विट कोणी गांभिर्याने घेतले नाही तर नवलच म्हणावे लागेल.
त्यामुळे विनोद शेअर करणा-या अनेक विनोदी पेजेसने अरविंद केजरीवलांनी चक्क आमच्यात सहभागी व्हावे अशा प्रकारच्या पोस्ट केल्या आहेत. तर काहिंना अरविंद केजरीवालांनी विनोदी पोस्ट करण्याची नोकरी करावी अशा स्वरुपाच्या टोकाच्या टीकाही केल्या आहे. ‘कोणीतरी आरएसएस म्हणजे रिलायन्स स्वयंसेवक संघ म्हणाले ‘ अशा स्वरुपाचे ट्विट केजरीवलांनी केले होते खरे. असे ट्विट करून त्यांना भाजप सरकार त्यातूनही मोदी आणि आरएसएसवर निशाणा साधायचा होता पण त्यांच्या नेम असा काहि चुकला कि नेटीझन्सने चक्क त्यांच्यावरच तो परतवून लावला.
रिलायन्स जिओ लाँच झाल्यावर दुस-याच दिवशी रिलायन्स जिओच्या जाहिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिलायन्सचे पीएम आहेत का असा सवाल केला होता. तसेच ‘मोदीजी तुम्ही असेच रिलायन्सच्या जाहिरातीत काम करत राहा. देशभरातील कामगार २०१९ च्या निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवतील’ असे  ट्विट करत मोदींवर निशाणा साधला होता. त्यांचे हे ट्विट अनेकांनी रिट्विट केले होते. अरविंद केजरीवाल हे नेहमीच मोदींवर निशाणा साधण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण त्यांच्या या नव्या ट्विटमुळे मोदींवरची टिका राहिली बाजूला पण त्यांच्या विनोदचातुर्याची मात्र खिल्ली उडवली जात आहे.