जेकॉब कार्टव्रेट नावाचा २२ वर्षांचा तरूण आठवड्यापूर्वी वेफर्सनं लादलेले बॉक्स घेऊन निघाला. पण जीपीएसमुळे तो रस्ता भरकटला आणि इच्छित स्थळी पोहोचण्याऐवजी निर्जन स्थळी पोहोचला. तीन दिवस तो जंगलात उपाशीपोटी भटकत होता. पण, या प्रामाणिक ट्रक चालकानं त्याच्या ट्रकमध्ये असलेल्या एकाही वेर्फसच्या पाकिटाला हात लावला नव्हता. त्याचा डिलिव्हरी कंपनी आणि सप्लायरशी संपर्क तुटल्यानंतर चौथ्या दिवशी जेकॉबला शोधण्यात पोलिसांना यश आलं.
सडलेल्या फळाच्या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांना वाटलं वायूगळती झाली अन् …
जेकॉब ‘लिटल ट्रि ट्रान्सपोटेशन’ कंपनीत काम करतो. वेर्फसनं भरलेले बॉक्स घेऊन तो पोर्टलँडवरून न्यासाला जायला निघाला होता. वेळेत त्याला ही ऑर्डर पोहोचवायची होती. यापूर्वी कधीही तो तिथे गेला नव्हता. त्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी त्यानं जीपीएसचा आधार घेतला. पण दुर्देवानं इच्छित स्थळी पोहोचण्याऐवजी तो जंगलात भरकटला. जंगलातल्या आडवाटेत त्याचा ट्रक फसला. त्यामुळे मदतीसाठी तो तीन दिवस जंगलात भटकत होता.
आईच्या कडेवरुन निसटलं 10 महिन्यांचं बाळ, एअर होस्टेसने उडी मारून वाचवले बाळाचे प्राण
अखेर बेपत्ता झाल्यानंतर चौथ्या दिवशी त्याला शोधण्यात पोलिसांना यश आलं. विशेष म्हणजे भूक लागली असतानाही तो आपल्या कंपनीशी प्रामाणिक राहिला त्यानं ट्रकमधल्या एकाही वेफर्सचा पाकिटाला हात लावला नव्हता अशी माहिती त्याच्या कंपनीनं दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2018 10:21 am