News Flash

वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होतोय ‘या’ महिला पोलीस अधिकाऱ्याचा फोटो

पण व्हायरल होण्यामागचं कारण वेगळंच

पोलिसांच्या गणवेशातला एका सुंदर तरुणीचा फोटो सोशल मीडियावर अल्पावधीच व्हायरल होऊ लागला.

सोशल मीडियाचा जसा फायदा आहे तसाच त्याचा तोटादेखील आहे. कारण अनेकदा सोशल मीडियावर खोट्या गोष्टीही वाऱ्याच्या वेगानं पसरतात. या माध्यमाची व्याप्ती खूप मोठी असल्यानं एखादी गोष्ट खरी आहे की खोटी याची शहानिशा न करता ती तशीच फॉरवर्ड करण्याची मानसिकता हळूहळू वाढत चालली आहे. याचीच प्रचिती आली पंजाबमध्ये. पोलिसांच्या गणवेशातला एका सुंदर तरुणीचा फोटो सोशल मीडियावर अल्पावधीच व्हायरल होऊ लागला. ही सुंदर तरूणी पंजाब पोलीस दलात कार्यरत असल्याचे सांगून तो फोटो व्हायरल झाला. अर्थात इतक्या सुंदर पोलीस अधिकाऱ्याच्या चर्चेला सुरूवात झाली, लोकांनी तिच्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.

म्हणून केट मिडलटनच्या गळ्यातील हार ठरला लक्षवेधक

Video : छेडछाड करणाऱ्या विद्यार्थ्यांची इंडिगोच्या एअरहॉस्टेसनं घेतली ‘शाळा’

पण नंतर मात्र लोकांना आपण केलेली गल्लत लक्षात आली. हा फोटो खऱ्याखुऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा नसून तो एका अभिनेत्रीचा आहे हे समजल्यावर लोकांना मात्र हसावं की रडावं असं झालं होतं. या अभिनेत्रीचं नाव कयामत अरोरा असून ती सध्या एका पंजाबी चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात ती हर्लिन मान नावाच्या महिला पोलिसाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे कदाचित लोकांचा अधिक गोंधळ उडाला असण्याची शक्यता आहे. पण काहीही असलं तरी ती सध्या ऑनलाइन सेन्सेशन ठरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 11:00 am

Web Title: truth behind the viral photo of punjab police officer harleen mann
Next Stories
1 १८ हजार प्रेक्षकांसमोर तोल घसरून पडलेल्या मॉडेलनं पाहा पुढे काय केलं
2 Google Doodle Celebrates Rukhmabai : ‘गुगल’चा डुडलद्वारे या मराठमोळ्या महिला डॉक्टरला सलाम, जाणून घ्या त्यांचे कार्य
3 म्हणून केट मिडलटनच्या गळ्यातील हार ठरला लक्षवेधक
Just Now!
X