जगात आजही चांगली माणसं आहेत. जी आपल्याला ओळखत नसली तर अडीअडचणीला आपल्या मदतीला नक्कीच धावून येतात. ओळखपाळख नसताना मदत देऊ करतात. याचा अनुभव आला तो कर्नाटकमधल्या एका कुटुंबाला. धार्मिक यात्रेसाठी ट्रेनमधून निघालेलं पाच जणांचे कुटुंब खूपच आनंदात होते. पण काही वेळातच त्यांच्या आनंदावर विरजण पडलं, अशावेळीही चांगुलपणा दाखवत एका टीसीने त्यांची मदत केली. ही मदत जरी छोटीशी असली तरी या कुटंबांसाठी मात्र ती खूपच मोठी होती.

दोन तरुणींनी वाचवले मरणासन्न अवस्थेत असलेल्या मुलीचे प्राण

मुळचे कर्नाटकचे असलेले विष्णु वर्धन आपल्या कुटुंबासोबत एका धार्मिक यात्रेला निघाले होते. त्यांच्या सोबत त्यांची दोन छोटी मुलं देखील होती. केरळला जाणा- ट्रेनची तिकिट त्यांनी आरक्षित केली होती. ही ट्रेन २५ तारखेला रात्री एक वाजताची होती. परंतु त्यांचा तारखेत गोंधळ झाला आणि त्यांनी २६ तारखेला रात्री १ वाजताची ट्रेन त्यांनी पकडली. जेव्हा टीसी तिकिट तपासायला बोगीत आला तेव्हा आपला तारखेत काहीतरी गोंधळ उडाला आहे हे या विष्णु वर्धन यांच्या लक्षात आले. आता टीसी आपल्याला एकतर मधूनच खाली उतरवणार किंवा दंड तरी वसूल करणार अशी भिती त्यांना होती. पण असे काहीच झाले. या कुटुंबाचा उडालेला गोंधळ त्याच्या लक्षात आला आणि या कुटुंबाला त्यांनी शांत केले. कोणताही दंड न आकारता त्याने आपल्याच मोबाईलमधून या कुटुंबाला ऑनलाइन तिकिट बुक करून दिली.

गगनचुंबी इमारतीत उभं राहणार जंगल

कदाचित आपल्याला याचे अप्रुप नसेलही पण अनेकांना टीसीचा वाईट अनुभव आलेला असतो, त्यामुळे ऐनवेळी या टीसीने केलेली मदत विष्णु यांच्यासाठी खूपच मोठी होती. आपल्याला आलेला हा चांगला अनुभव विष्णु यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.