28 September 2020

News Flash

Tula Pahate Re Memes: इशा-विक्रांतचे उखाणे अन् बरचं काही…

कथानकाप्रमाणे मिम्सही अपडेट होत आहेत

मिम्स व्हायरल

वय विसरायला लावणारी अनोखी प्रेमकहाणी ही संकल्पना घेऊन झी मराठी वाहिनीने ‘तुला पाहते रे’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली. अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. श्रीमंत घरातला विक्रांत सरंजामे आणि मध्यमवर्गीय कुटुंबातली इशा निमकर यांची प्रेमकहाणीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतली. विक्रांत इशाला प्रपोज करणार तेव्हा मालिकेचा महाएपिसोड निर्मात्यांनी प्रसारित केला. आता मालिकेत लवकरच इशा आणि विक्रांत विवाहबंधनात अडकणार आहेत. एकीकडे असे सगळे चित्र असतानाच दुसरीकडे या मालिकेवरील मिम्स सोशल मिडियावर व्हायरल होतना दिसत आहे. यापैकी अनेक मिम्स हे मालिकेची मुख्य संकल्पना असणाऱ्या वयातील अंतरावर आधारित आहेत. तर मालिकेतील कथानक जसे पुढे सरत आहे त्याप्रमाणे आता इशा आणि विक्रांतच्या नावाने वेगवेगळे उखाणेही व्हायरल होऊ लागले आहेत. चला पाहूयात असेच काही व्हायरल मिम्स…

 

प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे मालिकेत विक्रांतची भूमिका साकारत आहे. तर नवोदित अभिनेत्री गायत्री दातार इशाच्या भूमिकेत आहे. या दोघांची केमिस्ट्रीसुद्धा विशेष चर्चेत आहे. पहिल्या महिन्यापासूनच मालिकेने टीआरपी यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 5:14 pm

Web Title: tula pahate re memes went viral
Next Stories
1 बापरे! जेवताना दाताखाली आला चक्क अडीच लाखांचा मोती
2 …म्हणून आम्हीच बेस्ट, झोमॅटोला मुंबईच्या डबेवाल्यांचा टोला
3 VIDEO: हर्षलची ‘हंबरून वासराले..’ कविता ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले
Just Now!
X