दूध हा आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. लहान बाळासाठी पूर्णान्न असलेले दूध आपण वेगवेगळ्या मोठे झालो तरीही पितो. काहींना दूध अजिबात आवडत नाही तर काहींना खूप जास्त आवडते. पण कॅल्शियम आणि प्रथिनांचा मोठा स्त्रोत असलेले दूध आहारात असायलाच हवे. दुधाचे फायदे जवळपास सर्वांनाच माहित आहेत… आपल्यापैकी बरेचजण पॅकेटमधील दुधाचा वापर करतात. पण सध्या सोशल मीडियावर तुर्कीतला एका दुधाच्या फॅक्ट्रीमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण झाल्याशिवाय राहणार नाहीत…

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक व्यक्ती फॅक्ट्रीत दुधाच्या भरलेल्या टबमध्ये आंघोळ करताना दिसतोय. मगाने तो दूध अंगावर ओतत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ तुर्कीतील सेंट्रल अनटोलीअन या डेअरीमधील आहे. दुधाच्या टबमध्ये बसलेल्या या कर्मचाऱ्याचे नाव एमरे सायर आहे. तर हा व्हिडीओ अपलोड करणाऱ्या व्यक्तीचे नाव युगूर तुरगुट असे आहे. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

या कर्मचाऱ्याचं हे किळसवाणे कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिला आहेत. काहींनी तर याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.