24 October 2020

News Flash

ऑलिम्पिकच्या तयारीसाठी हिमा दासला आनंद महिंद्रा देणार आधार

ट्विट करत व्यक्त केल्या भावना

वेगवान धावपटू हिमा दास हिने नवा इतिहास रचला. IAAF वर्ल्ड अंडर २० अॅथेलॅटिक्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत तिने ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावले. ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिला भारतीय महिला ठरली. १८ वर्षीय हिमाने ५१.४६ सेकंदात ४०० मीटरचे अंतर पार करत ही स्पर्धा जिंकली. देशाची मान उंचावणाऱ्या हिमा दासच्या मदतीसाठी केंद्र सरकार आता पुढे सरसावले आहे. क्रिडा मंत्रालयाने तिला आर्थिक मदत जाहीर केली आहे. याबरोबरच प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करत आपण हिमाला आर्थिक मदत करण्यात उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

आता आपल्या सगळ्यांनाच हिमा दास हिला ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले पहायचे आहे. क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड आणि ऑलिम्पिकचे एडिल सुमारीवाला यांना या ट्विटमध्ये टॅग करत हे दोघाही तिला चांगले प्रशिक्षण मिळण्यासाठी नक्कीच चांगले प्रयत्न करतील असे म्हटले आहे. पण त्यापलिकडे जात शासकीय मदतीशिवाय तिला आर्थिक गरज असेल तर मला ती करायला आवडेल असे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये महिंद्रा यांनी हिमाचा सुवर्णपदक घेतलेला फोटोही शेअर केला आहे. हे ट्विट २४ हजार जणांनी लाईक केले असून ५ हजारहून अधिक जणांनी ते रिट्विट केले आहे.

हिमाची केंद्रीय क्रिडा मंत्रालयाच्या TOPS योजनेत निवड झाली आहे. या योजनेमार्फत ऑलिम्पिक पात्रतेसाठी लागणाऱ्या तयारीकरता हिमाला थेट निधी मिळणार आहे. यापुढे प्रत्येक महिन्याला हिमाला ५० हजाराची मदत मिळणार आहे. आसामची रहिवाशी असलेल्या हिमाने एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुलस्पर्धेमध्ये भारतीय अंडर २०मध्ये ५१.३२ सेकंदात रेस पार करीत सहाव्या स्थानावर राहिली होती. त्यानंतर सातत्याने तिने आपली वेळ सुधारली. नुकतेच तिने आंतरराज्यीय चॅम्पिअनशीपमध्येदेखील सुवर्णपदक जिंकले होते. या इव्हेंटमध्ये तिने ५१.१३ सेकंदाचा वेळ घेतला होता. वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअनशीपमध्ये यापूर्वी भारतासाठी सीमा पूनिया २००२मधील डिस्कस थ्रोमध्ये कांस्य आणि नवजीतकौर ढिल्लनने २०१४मध्ये ब्रॉन्झ पदक जिंकले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 12:55 pm

Web Title: tweet aanand mahindra regarding financial help to athlet hima das
Next Stories
1 रमेश पोवारची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड
2 ‘५० लाख लोकसंख्येचा देश फुटबॉल खेळतोय आणि आम्ही हिंदू मुस्लिम खेळतोय’
3 Wimbeldon 2018 Women’s Final : बाबरेरा, कॅटरिना जोडीचे सलग दुसरे विजेतेपद
Just Now!
X