News Flash

Video : एका लग्नाची दुर्मीळ गोष्ट, जुळ्या भावांनी केला जुळ्या बहिणींशी विवाह

लग्नाची गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरली

३ डिसेंबरला या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.

आतापर्यंत तुम्ही आगळ्या वेगळ्या, हटके विवाहसोहळ्यांबद्दल खूप ऐकलं असेल पण चीनमध्ये गेल्या आठवड्यात एक भन्नाट विवाहसोहळा पार पडला. गंमत म्हणजे अशी की, इथल्या जुळ्या भावडांनी जुळ्या बहिणींशी लग्न केलं. त्यामुळे या दुर्मीळ लग्नाची गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या नावातही कमालीचं साधर्म्य आहे.

झेंग डॅश्यूअँग आणि झेंग शिओश्यूअँग अशी भावांची नावं आहेत तर लिअँग जिंग आणि लिअँग क्विंग अशी बहिणींची नावं आहेत. ३ डिसेंबरला या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या बहिणी २३ वर्षांच्या आहेत तर भावंडं २६ वर्षांचे आहेत. ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी भारतातही असे घडले होते. केरळ मधल्या दोन जुळ्या बहिणींनी जुळ्या भावांशी लग्न केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 5:29 pm

Web Title: twin brothers marry twin sisters
Next Stories
1 गेम खेळून झाला जगातील ‘श्रीमंत यूट्युबर’, वार्षिक कमाई ८० कोटी
2 Video : वयाच्या साठीतही लष्करी शिस्त कायम
3 Video: मुकेश अंबानींच्या मुलाच्या व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेचे सत्य
Just Now!
X