News Flash

जुळ्या बहिणींचा बॉयफ्रेंडही एकच! तोही एकदम खुश

ही आगळीवेगळी गोष्ट वाचून तुम्हीही व्हाल थक्क

जुळ्या बहीण-भावडांच्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून सारख्या असतात हे आपल्याला माहित आहे. यासाठी जुळ्याचे दुखणे अशी म्हणही मराठीमध्ये वापरली जाते. पण त्याहूनही पुढे जात एक अनोखी गोष्ट घडली आहे. जुळ्या बहीणींना मुलगाही एकच आवडला आहे. विशेष म्हणजे तो त्या दोघींचाही बॉयफ्रेंड आहे. या दोघीही ऑस्ट्रेलियातील असून अॅना आणि ल्यूसी अशी त्यांची नावे आहेत. या दोघीही सर्वात जास्त एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्या बहीणी आहेत असा त्यांचा दावा आहे. त्या दोघींनाही एकच मुलगा आवडत असून त्या दोघीही त्याच्यासोबत अतिशय आनंदाने राहत आहेत. या दोघींनी काही वर्षांपूर्वी आपल्यातील थोडासा फरक झाकण्यासाठी कॉस्मेटीक सर्जरीही करुन घेतली होती.

या दोघींनी बॉयफ्रेंडपासून मूल व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. जर कायद्याने आपल्याला परवानगी दिली तर दोघीही त्याच्याशी लग्न करायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या दोघींनीही एकसारखेच कपडे घालून आपल्या या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावर त्यांच्या या फोटोला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली असून अनेकांनी त्यांना त्यांच्या या अनोख्या रिलेशनशिपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. DOUBLE THE LOVE FOR BEN असे त्यांनी आपल्या या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2019 7:32 pm

Web Title: twin sisters dating the same guy australia want him to impregnate them their boyfriend is also very happy
Next Stories
1 ट्विटरचा विजय: कुवेतमधून पळालेल्या तरुणीला थायलंड देणार आसरा
2 WhatsApp थीमची आगळीवेगळी लग्नपत्रिका
3 एकतर्फी प्रेमाचा कहर! प्रपोजल नाकारल्याने महिलेने पाठवले चक्क एक लाख ५९ हजार मेसेज
Just Now!
X